Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात १५ जून पर्यंत राहतील ‘हे’ विशेष निर्बंध ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

Editorial Team by Editorial Team
May 31, 2021
in Featured, जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात १५ जून पर्यंत राहतील ‘हे’ विशेष निर्बंध ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी :– राज्यात ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करुन त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल दिली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सोमवारी सायंकाळी विशेष आदेश जारी केले आहे.

संपूर्ण जळगाव जिल्ह्यात 1 जून, 2021 रोजी सकाळी 07.00 वाजेपावेतो संचारबंदीसह सुधारीत विशेष निर्बंध लागू करण्यात आलेले होते.  याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज निर्गमित केले आहे.

काय राहणार बंद, काय राहणार सुरु?

a) अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने दररोज सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 या वेळेत सुरु राहतील.

b) स्वतंत्र ठिकाणी असलेली (Standalone Single shops) इतर प्रकारचे सर्व दुकाने हे केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत सुरु राहतील. सदरची Non-Essential दुकाने दर शनिवार व रविवार या दोनही दिवशी पूर्ण वेळ बंद राहतील. सर्व Essential व Non-Essential प्रकारच्या दुकानांच्या प्रवेशाच्या ठिकाणी /काऊंटर समोर एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश राहणार नाही.

c) दुकान मालक/चालक यांनी दुकानांच्या दर्शनी भागात बँक काऊंटर प्रमाणे काच/प्लास्टीकचे पारदर्शक शीट किंवा कमी खर्चात करावयाचे असल्यास पारदर्शक प्लास्टीक पडदा यांचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच सदर पडद्यातून केवळ ग्राहकास वस्तूंची देवाण-घेवाण करता येईल एवढीच मोकळी जागा ठेवण्यात यावी.

d) अत्यावश्यक वस्तू व सेवांबाबत घरपोच वितरण सुविधा (Home deliveries) ह्या दररोज सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत देता येतील. ई कॉमर्स सुविधेद्वारे Non-Essential वस्तूंची सुविधा सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत देता येतील.

e) सर्व प्रकारची केश कर्तनालये (सलून), स्पा सेंटर्स, जिम पूर्णपणे बंद राहतील.

f) अत्यावश्यक कारणांव्यतिरीक्त दुपारी 2.00 वाजेनंतर नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास बंदी राहील.

g) सर्व शासकीय कार्यालयात (आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कार्यालये, पोलीस विभाग, अत्यावश्यक सेवा संबंधित कार्यालये वगळून) 25% कार्यालयीन उपस्थिती राहील.  तथापि, कार्यालयीन उपस्थिती वाढविण्याबाबत कार्यालय प्रमुखांनी निर्णय घ्यावा.

h) जळगाव जिल्हा हा कृषीप्रधान असल्याने व मान्सूनपूर्व शेती विषयक कामे, पेरणी हंगाम सुरु असल्याने कृषी संबंधित सेवा पुरविणारी दुकाने हे दररोज सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत सुरु ठेवता येतील.

i) माल वाहतूक /कार्गो वाहतूक सुरळीतपणे सुरु राहील. तसेच सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 या वेळेनंतर देखील दुकानात केवळ माल भरण्याकरीता सुट राहील. तथापि सुट दिलेल्या वेळेनंतर दुकानातून ग्राहकास सेवा पुरविता येणार नाही. शासन आदेश दिनांक 12 मे, 2021 अन्वये नियमांचे उल्लंघन करणारे दुकान मालक/चालक व घटक यांचेकडून रुपये 10 हजार मात्र दंड आकारण्यात येईल व पुन्हा चूक केल्याचे आढळून आल्यास कोविड-19 चा संसर्ग कमी होईपावेतो सदचे दुकाने बंद ठेवण्यात येतील.

j) वरील नमूद आस्थापनांच्या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी / कामगार यांचे भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (वय वर्षे 45 वरील) लसीकरण करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच सदर कर्मचारी/कामगार यांची साप्ताहिक RTPCR चाचणी करुन घेणे बंधनकारक राहील.

k) मॉर्निंग वॉक, सायकलींग, खुल्या मैदानातील व्यायाम याकरीता केवळ सकाळी 4.00 ते 8.00 यावेळेतच सुट राहील.

भविष्यात जळगाव जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10 % किंवा अधिक झाल्यास व ऑक्सिजन बेडची उपलब्धता 40 % पेक्षा कमी झाल्यास सदरच्या आदेशात नव्याने सुधारणा करण्यात येईल.

जळगांव शहर महानगरपालिका व जळगांव जिल्हयातील सर्व नगरपालिका/नगर पंचायत भागातील गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर, हातगाडीवर वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची (वेंडर्स/ हॉकर्स) व त्या ठिकाणी खरेदी साठी नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याने शहरातील गर्दी होणाऱ्या अशा ठिकाणी रस्त्यांवर, हातगाडीवर वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना (वेंडर्स/ हॉकर्स) संबंधित वस्तूंची विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात यावी. तथापि जे वेंडर्स/हॉकर्स सदर निर्देशाचे उल्लंघन करतील त्यांचेवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात यावी.

वरील सुचनांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तरित्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असेही श्री. राऊत यांनी आदेशात म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात भाजपला तिसरा झटका ; आणखी ७ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर?

Next Post

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज केवळ १५८ नवे रुग्ण आढळले

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; आज केवळ १६९ नवे रुग्ण

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज केवळ १५८ नवे रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us