Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन

बियाणे पेरणी, कोळपणी व फवारणी करणारा इलेक्ट्रीक बैल ठरणार प्रदर्शनाचे आकर्षण; प्रदर्शन मोफत

najarkaid by najarkaid
November 1, 2023
in जळगाव
0
जळगावात 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – कृषी विस्ताराच्या कार्यात गेल्या आठ वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणार्‍या अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते शुक्रवारी (3 नोव्हेंबर) रोजी दुपारी 12 वाजता होईल. निर्मल सीड्सचे डॉ. सुरेश पाटील, प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, ओम गायत्री नर्सरीचे मधुकर गवळी, मेट्रोजेन बायोटेकचे प्रियंक शहा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. प्रदर्शनात प्रवेश मोफत असून तंत्रज्ञानावर आधारीत या कृषी प्रदर्शनाचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

तब्बल चार एकर परिसरात 210 पेक्षा अधिक स्टॉल्स असलेले अ‍ॅग्रोवर्ल्डचे चार दिवसीय कृषी प्रदर्शन खान्देशातील शेतकर्‍यांसाठी पर्वणी ठरणार आहे. बदलते हवामान, मजूर टंचाई, अद्ययावत तंत्रज्ञान, करार शेती, कमी पाण्यात येणारी पिके अशा शेतकर्‍यांची मागणी व गरजेवर आधारित मांडणी हे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे. अ‍ॅग्रोवर्ल्डचे जळगावतील यंदाचे हे नववे प्रदर्शन असून एक लाखांहून अधिक शेतकरी प्रदर्शनाला भेट देतात. जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषीतंत्र, श्रीराम ठिबक, निर्मल सिड्स, के. बी. एक्स्पोर्ट, ओम गायत्री नर्सरी, आनंद अ‍ॅग्रो केअर, मेट्रोजेन बायोटेक, कमलसुधा ट्रॅक्टर, आर. सी. बाफना ज्वेलर्स हे सहप्रायोजक आहेत.

इलेक्ट्रिक बुल, करार शेती, ड्रोन, मिल्किंग मशीनसह प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
बियाणे पेरणी, कोळपणी, फवारणी करण्याबरोबरच जीपीएस तंत्रावर चालणारा तसेच मजूर समस्येला पर्यायी इलेक्ट्रीक बैल, ड्रोन यांसारखी यंत्रे व अवजारांचे स्वतंत्र दालन, शाश्वत उत्पन्नासाठी करार शेतीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या फळभाज्या – भाजीपाला, बांबू अशा अनेक प्रकारच्या करार शेतीची माहिती देणार्‍या कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी, वन्य प्राण्यांपासून संरक्षण देणारे झटका मशीन, मोबाईल स्टार्टर, मिल्किंग मशीन, काटेकोर पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणार्‍या विविध पिकांमधील वाणांबाबत सखोल मार्गदर्शन, कमी श्रमात – कमी पाण्यात मात्र शाश्वत उत्पादन देणार्‍या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स एकाच छताखाली असणार आहेत. प्रदर्शनस्थळी शेतीविषयक विविध पुस्तके देखील विक्रीसाठी उपलब्ध राहतील.

पाणी परीक्षण व भाजीपाला बियाणे मोफत
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पहिल्या पाच हजार नोंदणीधारक शेतकर्‍यांना निर्मल सीड्सतर्फे विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे दहा ग्रॅम बियाण्याचे एक पाकीट मोफत दिले जाणार आहे. ओम गायत्री नर्सरी तसेच आनंद अ‍ॅग्रो केअर यांच्यातर्फे पाण्याचा PH, EC, TDS परीक्षण मोफत व तात्काळ करून मिळेल. शेतकर्‍यांनी या आधुनिक कृषी यंत्र व अवजारे प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील अंगणवाड्या स्मार्ट करण्यावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Next Post

एरंडोल शहरात साकारतोय ‘पुस्तकांचा बगीचा’ राज्यातील पहिलाच उपक्रम

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
एरंडोल शहरात साकारतोय ‘पुस्तकांचा बगीचा’  राज्यातील पहिलाच उपक्रम

एरंडोल शहरात साकारतोय 'पुस्तकांचा बगीचा' राज्यातील पहिलाच उपक्रम

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us