चहार्डी येथून एकाला अटक ;सोबत असणाराचं निघाला दरोड्याच्या मास्टरमाइंड ; तीन फरार
जळगाव – चोपडा शहराच्या जवळ चोपडा सहकारी साखर कारखाना येथे आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास रस्त्यात दगड आडवे टाकून आणि पिस्तूल रोखून लूट करण्याच्या प्रयत्नात असेल्या आरोपींचा पोलिसांनी अवघ्या ६ तासात छडा लावत एकाला चहार्डी येथून ताब्यात घेतले आहे . यात मदतीला गेलेला छोटू बापू धनगर हा सुद्धा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले असून राजेश बिल याला ताब्यात घेण्यात आले असून अन्य छोटू धनगरसह अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहे .
याबाबत माहिती अशी कि , दिलीप काशीनाथ धनगर हे व त्यांचे पार्टनर कलीम सलीम खाटीक रा.हातेड बु ता.चोपडा हे तालुक्यातुन शेळी व मेंढी खरेदीकरुन ती विक्री साठी हैद्राबाद येथे घेवुन बाजारात विक्री करीत असतात. गेल्या आठवड्यात त्यांनी चहार्डी शिवारातुन १०० मेंढ्या खरेदी केल्या होत्या. सदर (शेळ्या) मेंढ्या २ जून रविवार रोजी ते व कलीम यांचे काका बाबु खाटीक याच्या मालकीची महिंद्रा पिकअप व्हॅन क्र.एम.एच.१८ बी.जे.०६६८ मध्ये सायंकाळी ४ ते साडेचार वा.च्या सुमारास भरुन चालक संतोष ओंकार जाधव रा.अजनाड ता.शिरपुर व मदतीला छोटु बापु धनगर रा.चहार्डी ता.चोपडा असे हैद्राबाद येथे विक्री करीता घेवुन गेले होते. तेथे दि. ४ जून मंगळवारी सकाळी ४ वाजता पोहचले .तेथे सकाळी १० वाजेपर्यंत मेंढ्या विक्री करुन सदर मेंढ्या विक्रीचे एकुण ३ लाख ७० हजार रोख असे मिळाल्याने सदर पैश्यांमधुन १० हजार रुपयांचे .डिजेल व खर्चाकरीता काढुन उर्वरीत ३ लाख ६० हजार .त्यांचे जवळील बागयती पांढ-या रुमाराल बांधुन गाडीचे डिक्कीमध्ये सिटच्या बाजुस ठेवले होते . नंतर सकाळी १० वाजता हैदाबाद येथुन चहार्डी करीता निघाले.
आज ५ रोजी पहाटे हैद्राबाद येथुन सिल्लोड-नेरी -एरंडोल-धरणगाव मार्गे निमगव्हाण ता.चोपडा येथे सकाळी ५ वाजता पोहचले व निमगव्हाण येथे पेट्रोल पंपावर चालक संतोष जाधव व पार्टनर कलीम खाटीक यांनी वाहनात डिजेल भरले . तेव्हा वाहनात ड्रायव्हरचा बाजुला कलीम खाटीक हे बसले होते. त्याचे शेजारी दिलीप धनगर हे दरवाज्याजवळ बसले होते.गाडीचे मागे छोटु धनगर हा बसलेला होता. ते वाहनाने वेले मार्गे चहार्डी साखर कारखाना मार्गे चहार्डी येथे जात असतांना चहार्डी साखर कारखाना गेटच्या अलीकडे रोडवर सकाळी साडेपाच वाजेच्या सुमरास आले . यावेळी रस्त्यावर मोठमोठे दगड टाकण्यात आले होते . त्यामुळे ड्रायव्हरने वाहन थांबविले असता साखर कारखान्याचा गेटचे अलीकडे दगडाजवळच तीन इसम तोंडावर रुमाल बांधून आले . दोन इसमांजवळ हातात लोखंडी सळई होत्या . वाहन थांबताच तिघांपैकी एक जण दिलीप धनगर यांचे जवळ आला. तसेच यातील एकजण वाहनचालकाकडे गेला.तर तिसरा इसम वाहनाजवळ पुढे थांबला . दिलीप धनगर यांचे जवळ आलेल्या इसमाने त्याचे जवळील पिस्तोल डोक्यास लावुन खाली उतरण्यास सांगितले. चालकाजवळील एकाने वाहनचालक संतोष यास पिस्तोल लावुन खाली उतरविले. तेव्हा दिलीप धनगर हे उतरत असतांना त्यांचे जवळ उभा असलेला साथीदार याने त्याचा हातातील लोखंड़ी सळई त्यांच्या डाव्या पायाचा गुडघ्याजवळ मारली . तेव्हा पिस्तोल धरलेल्या इसमाने त्यास पुन्हा मार असे मराठीत बोलला . त्यावेळी दिलीप धनगर यांनी त्यास मला मारु नको मी पैसे देतो असे म्हणुन त्यांच्या पँटच्या खिश्यातील ७ हजार रुपये सळई मारणा-या इसमास दिले. त्यावेळी त्यांच्या बाजुला बसलेला कलीम यास खाली उतरविले . वाहनचालकाकडील बाजूला पिस्तोलधारी इसमाने ड्रायव्हर संतोष यास खाली उतरविले व पिस्तोलचा धाक दाखवुन त्यास पळ असे म्हणाल्यानेवाहन चालक पळुन गेला. त्यावेळी सदर पिस्तुलधारी इसमाने गाडीचे कॅबीनची झडती घेत असतांना ड्रायव्हर सिटच्या बाजुला डिक्कीत ठेवलेले रुमालात बांधलेले रोख३ लाख ६० हजार काढले .तेव्हा त्यांचाकडील दोन्ही इसम हे कलीम यास चापटाबुक्क्यांनी मारहाण करीत असतांना त्याचे खिश्यातील मोबाईल सदर इसमांनी काढला. त्यावेळी कलीम याने त्याचे खिश्यातील ३ हजार काढुन जमिनीवर फेकले . ते पैसे त्यांनी उचलुन तिन्ही भामटे पळुन जात असतांना कलीम खाटीक व मागे बसलेला छोटु धनगर अश्यांनी त्यांना दगड मारुन पाठलाग केला . यावेळी पिस्तोल धारी भामट्याकडे असलेल्या ३ लाख ६० हजारांची रक्कम खाली पडल्याने कलीम खाटीक याने उचलली . मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले . यातील एकाने सळईने मारहाण करुन मोटर सायकलने पळुन गेले.
अंदाजे वय २५ ते ३० वयोगटातील त्यात दोन इसम उंच व एक बुटका तोंडास रुमाल बांधलेले असे वर्णनाचे अज्ञात तीन अनोळखी इसमांनी रस्त्यावर दगड आडवे लावुन आमच्या वाहन अडवुन त्याचे जवळील पिस्तोलचा धाक दाखवुन व सळईने त्यांना डाव्या पायाचे गुडघ्याजवळ सळईने मारुन दुखापत करुन त्यांचे जवळील रोख ७ हजार रुपये व पार्टनर कलीम सलीम खाटीक रा.हातेड बु।.ता.चोपडा याचे जवळील रोख ३ हजार रुपये .व सॅमसंग कंपनीचा जुना वापरता १ हजार किंमतीचा मोबाईल जबरीने घेवुन पळुन गेले . तसेच यातील एकाने हवेत गोळीबार केला म्हणून त्यांचे विरुध्द चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता .
एकास चहार्डीतून अटक ; दिली गुन्ह्याची कबुली
या गुन्हया बाबत पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी तात्काळ घटनास्थळावर भेट देवुन अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे,सहायक पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम व चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी गुन्हा उघडकीस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले.त्याअनुषंगाने तात्काळ पोलीस पथके रवाना करुन चहार्डी गावातुन एक संशयीत इसम ताब्यात घेवुन त्यास सखोल विचारपुस केली असता त्याने व त्याचे तीन साथीदारांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. यात एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित तिघांना ताब्यात घेण्यासाठी पथके पाठविण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
दरोड्याचा गुन्हा उघडीस आणणे कामी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले ,अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे,सहायक पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल ,पोलीस निरीक्षकबापु रोहोम व पोलीस निरीक्षकविनायक लोकरे, पोलीस उपनिरीक्षक यादव भदाणे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्रर तुरनर यांचे सह स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, पोहेकॉ.चंद्रकांत पाटील, विजय पाटील, नारायण पाटील, राचमंद्र बोरसे, किरण चौधरी,नरेंद्र वारुळे, दादाभाऊ पाटील, प्रकाश महाजन, विकास वाघ,मनोज दुसाने,रविंद्र गिरासे, दिनेश बडगुजर, विनयकुमार देसले, महेश पाटील, प्रविण हिवराळे, मुरलीधर बारी,साहेबराव चौधरी व चोपडा पोलीस स्टेशन कडील मधुकर पवार,सुनिल कोळी, सुनिल पाटील, राजु महाजन,प्रविण मांडोळे, विलेश सोनवणे,संदेश पाटील, वेलचंद पवार, रविंद्र पाटील, शाम पवार ,विठठल धनगर,जयदिप राजपुत, संगिता पवार,जानुराम मोरे तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील समीर पाटील, तुषार गिरासे अशांनी तात्काळ वेले , चहार्डी ,निमगव्हाण , आखातखेडे,आकुलखेडे इत्यादी गावामध्ये तात्काळ जावुन गोपनिय माहिती काढुन चहार्डी गावातुन एकाआरोपीला ताब्यात घेवुन हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा अवघ्या 06 तासांत आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणला . यामुळे पोलिस दलाचे कौतुक होत आहे .













