चाळीसगाव – शिवस्वराज्य यात्रा-९ आॕगस्टला जिल्ह्यात येत असून चाळीसगाव येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात पुन्हा रयतेचे राज्य यावे यासाठी शिवनेरी ते रायगड अशी ६ आॕगस्टला निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवार ९ आॕगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात येत असुन,पारोळा,धरणगाव,पाचोरा मार्गे सायंकाळी ६ वाजता ही यात्रा चाळीसगावात पोहोचेल,६ः३० वाजता राष्ट्रीय महाविद्यालयात खासदार उद्यनराजे भोसले,खासदार डाॕ.अमोल कोल्हे,विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे,छगनराव भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा होईल,तरी शेतकरी युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पत्रपरिषदेत केले.
यावेळी माजी आमदार राजिव देशमुख,शशिकांत साळुंखे,सुरेश चौधरी,प्रमोद पाटील,भगवान राजपूत,दिनेश पाटील,रामचंद्र जाधव,अजय पाटील,विष्णू चकोर,शसुर्यकांत ठाकुर,मिलिंद शेलार व कार्यकर्ते उपस्थित होते.