Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चार पोलिसांच्या निलंबनाच्या कारवाईने जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ

Editorial Team by Editorial Team
May 11, 2022
in जळगाव
0
राज्यात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पोलीस दलातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी कैद्यांना मोबाईल वापरासह नातेवाईकांना भेटण्याची मोकळीक दिली असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. संदीप पंडितराव ठाकरे, पारस नरेंद्र बाविस्कर, किरण अशाेक काेळी, राजेश पुरुषाेत्तम काेळी असे निलंबित पाेलिसांचे नावे आहेत.

काय आहे प्रकरण?
जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल कैदी सतीश गायकवाड व दशरथ महाजन या दोघांमध्ये रविवारी रात्री कैदी वॉर्डात वाद झाले. या प्रकारामुळे वॉर्डात दहशत पसरली होती. साेमवारी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. तर वॉर्ड क्र. ९ मधील डॉक्टरांनी गोपनीय अहवाल वैद्यकीय अधिष्ठातांना दिला. यात रुग्णालयाच्या वॉर्डात येणारे कैदी पोलिसांच्या उपस्थितीत दारू पितात आणि दारूमुळे नशा आल्यावर एकमेकांशी भांडण व हाणामाऱ्या करतात. तिथे त्यांची पत्नी, नातेवाईक, कार्यकर्ते त्यांना भेटायला येतात. त्यांच्यासोबत ते आवारात फिरून येतात. मोबाइलवर बोलत राहतात. त्यांच्या या कृत्यांमुळे जिल्हा रुग्णालयातील शेजारच्या वाॅर्डात दहशत पसरली असून, रुग्णांनाा त्रास होतो आहे, असे नमूद केले होते. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते.

हे पण वाचा :

पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! बेसिलमध्ये डेटा एंट्री ऑपरेटरच्या पदांसाठी बंपर भरती

संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती

बँकेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, या बँकेत 690 हून अधिक जागा रिक्त, लवकरच अर्ज करा

भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 पदांची बंपर भरती, ग्रॅज्युएट पाससाठी सुवर्णसंधी..

सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी चौकशी केली. रुग्णालयाच्या कैदी वॉर्डाबाहेरील दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज सोमवारीच चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हे फुटेज स्वत: पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी पाहिले. त्यात कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून आला. न्यायालयीन बंद्यांना गैरप्रकार करण्यासाठी पोलिस सूट देत असल्याचे दिसून आले. कैदी वॉर्डातून बंदी असलेले संशयित विनाकारण बाहेर फिरतात, कुटंुबीय थेट त्यांना भेटतात, घरून जेवणाचा डबा आणला जातो, दारू पिण्याचे व्हिडिओ चित्रित होऊ नये म्हणून वॉर्डातील सीसीटीव्ही कॅमेरा तोडून ठेवला आहे. अशा अनेक गंभीर बाबी सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाल्या. चौकशीअंती डॉ. मुंढे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणावर ठपका ठेवत चाैघा पाेलिस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाशिक येवला रस्त्यावर अपघात ; चार मित्रांचा जागीच मृत्यू

Next Post

पत्नीने सेक्स करण्यास नकार दिला तर पुरुषांना काय वाटते? सरकारी अहवालात धक्कादायक माहिती उघड

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us