Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्लॅमआनंद सुपर मॉडेल इंडिया स्पर्धेत ”तन्वी मल्हारा ठरली मिस मल्टीनॅशनल इंडिया”

najarkaid by najarkaid
September 30, 2019
in जळगाव
0
ग्लॅमआनंद सुपर मॉडेल इंडिया स्पर्धेत ”तन्वी मल्हारा ठरली मिस मल्टीनॅशनल इंडिया”
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  सौंदर्य आणि टॅलेंट यावर आधारित मिस इंटरनॅशनल, मिस मल्टीनॅशनल व मिस अर्थ या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत निवड होण्यासाठी जयपूर येथे पार पडलेल्या ”ग्लॅमआनंद सुपर मॉडेल इंडिया” स्पर्धेत जळगावच्या तन्वी मल्हाराने मिस मल्टीनॅशनलचा किताब जिंकला. २९ सप्टेंबर रोजी ही स्पर्धा पार पडली.

ब्रेन वुईथ ब्युटीचे निकष असणाऱ्या या सौंदर्य स्पर्धेत तन्वीने आपल्या सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि कॉमनसेन्सने उपस्थितांना भुरळ पाडत स्पर्धेत मिस मल्टिनॅशनलचा किताब खेचून आणला. ब्युटी वुईथ कॉजचे अतिशय समर्पक उदाहरण परीक्षक आणि उपस्थितांसमोर ठेवून तन्वीने या किताबावर आपले व अप्रत्यक्षरित्या जळगावचे नाव कोरले.  विविध टप्पे पार करून टॉप १९ मधून तन्वी टॉप १२ पर्यंत पोहचली. नंतर अंतिम टॉप ७ मध्ये निवड झाली.

टॉप ७ मध्ये प्रत्येकाच्या बुद्धिमत्ता, कॉमनसेन्स, सामाजिक भान या कौशल्याचा कस लागला. यामध्ये तन्वीला दोन प्रश्न विचारण्यात आले होते, ”तू रेडिओ जॉकी राहिलेली आहेस, तुझ्या दृष्टीने समोरच्याचा आवाज महत्वाचा आहे की चेहरा?’ यावर तन्वीने अतिशय सहज उत्तर दिले की मी आवाजाला महत्व देईल. कारण चेहऱ्यावरून गफलत होऊ शकते.” दुसरा प्रश्न तिला ”मी टू” या कॅम्पेन बद्दल विचारण्यात आला होता. त्यात तिने सहज उत्तर देत उपस्थितांची मने जिंकली आणि येथेच तिच्या विजयाचा युरेका क्षण बनून आला. मी टू चळवळीबद्दल तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नाला तिने उत्तर दिले कि, ‘या चळवळीमुळे महिला सक्षमीकरणासाठी वाव मिळाला, महिलांना आपल्यावर होणाऱ्या अत्याचारावर निर्भीडपणे बोलण्याचे धाडस आतून मिळू लागले,तसेच महिला स्वतःचे अस्तित्व या चळवळीमुळे टिकवून ठेवतील. त्यामुळे ही चळवळ महत्वाची आहे असे तिने सांगितले.

इतर राऊंड सोबतच सोशल मीडिया राऊंडचा देखील समावेश होता. यामध्ये फेसबुक, इंस्टाग्रामच्या पेजवर किती लाईक, शेअर व कमेंट्स मिळतात यावरून गुण दिले जाणार होते. यामध्ये तन्वीला इंस्टाग्रामवर सर्वाधिक आठशे लाईक्स व सातशे पंधरा कमेंट्स तसेच फेसबुकवर चारशे त्रेचाळीस लाईक्स व तीनशे नव्वद कमेंट्स मिळाले. त्याच प्रमाणे सौंदर्य स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांना सामाजिक कार्यासाठी देखील निधी गोळा करून देण्याचा टास्क देण्यात आला होता. यामध्ये तन्वीने सर्वाधिक सत्तर हजार रुपये स्वराज जनकल्याण समिती या आयोजकांनी दिलेल्या सामाजिक संस्थेसाठी गोळा करून दिले. येत्या डिसेंबर महिन्यात दिल्ली येथे मिस मल्टिनॅशनल या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आता तन्वी अन्य देशांच्या स्पर्धकांसोबत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

तन्वी हिचे आठवी पर्यंतचे शिक्षण सेंट टेरेसा हायस्कुल येथे झाले. येथे तिच्या वक्तृत्व कौशल्याला वाव मिळाला. बोलण्याचे कसब आणि धाडस तिने टेरेसा स्कुल मध्ये असतांनाच आत्मसात केले. नंतर नववी ते बारावी पर्यंतचे तिचे शिक्षण अनुभूती इंटरनॅशनल स्कुलमध्ये झाले. अनुभूतीमध्ये तिच्या वैचारिकतेत भर पडली. वेगवेगळ्या पद्धतीने कसे विचार करावे, मुळातच विचार कसे करावे, विचारांशी डील कशी करावी याचे कसब तिला अनुभूती स्कुलमधून शिकण्यास मदत झाली. तद्नंतर पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेजला बी.ए. इन लिबरल आर्टसला तिने प्रवेश घेतला. येथे वेगवेगळ्या विषयांवर प्रेझेंटेशन कसे करावे, कॉन्फिडन्स कसा बिल्डअप करावा यासारख्या कला तिने शिकून घेतल्या. पुणे येथे झालेल्या मिस दिवा पुणे या स्पर्धेत तिने सहज म्हणून भाग घेतला आणि या स्पर्धेत ती निवडली गेली. या नंतर तिने मिस पुणे साठी ऑडिशन दिली आणि येथेही विजेती ठरली होती. विजयाची ही शृंखला अबाधित ठेवत नंतर तिने मिस फेमिना व मिस डिव्हाईनचे सब टायटल जिंकले.  तन्वीला लहानपणापासूनच बोलण्याचा, अभिनय करण्याचा आणि कॅमेऱ्यासमोर प्रेझेंट राहण्याचा छंद होता. तिने काही वर्ष रेडिओ जॉकी म्हणून देखील काम केले. येथे तिच्या बोलण्याच्या आणि लोकांशी संवाद साधण्याच्या  कलेला पुरेपूर वाव मिळाला. परंतु तेथे फक्त लोकांचा आवाज ऐकू येत असे वा केवळ आवाजाद्वारे संवाद साधता येत असे म्हणून तिने त्या सोबतच वेब सिरीज, शॉर्ट फिल्म, म्युझिक अल्बम्स देखील केले. वेगवेगळे प्रयोग करीत असतांनाच तिच्यातील वेगवेगळ्या कलागुण व कौशल्याला आकार येत गेला.

लहानपणापासूनच तन्वीला तिच्या परिवाराकडून प्रोत्साहन मिळत आलेले आहे. तन्वीने या विजयाचे श्रेय तिच्या परिवारातील सदस्य,मित्र मंडळी व सर्व शुभचिंतकांना दिले आहे. या स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तन्वी ही मल्हार कम्युनिकेशन्सचे संचालक आनंद मल्हारा व सौ. नलिनी मल्हारा यांची सुपुत्री आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आ.एकनाथराव खडसे यांनी अराध्यदैवत मुक्ताईचे घेतले दर्शन !

Next Post

शिरीषदादा चौधरींच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत लोकजनशक्‍ती पार्टीच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us