मुंबई : एकीकडे राज्यात पुरामुळे अनेकांच्या डोळ्यात पाणी येत आहे तर दुसरीकडे काही नेतेमंडळी पुराची पाहणी करण्याच्या नावाखाली सेल्फी घेताना दिसत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. पूरग्रस्त जिल्ह्याच्या पाहणीसाठी निघालेले गिरीश महाजन चक्क सेल्फीसाठी पोझ देत, हातवारे करत जणू पुराचे पर्यटन करण्यासाठी आले आहेत असेच दिसत आहे. त्यांच्या याच कृतीचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला आहेस त्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय! ‘त्या’ लेकराच्या मृतदेहाचे चित्र आठवले तर मनाला चटका लागून डोळ्यात टचकन पाणी येतं.
राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून त्यांना खडेबोल सुनावले आहेत. सत्ताधाऱ्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठलाय! ‘त्या’ लेकराच्या मृतदेहाचे चित्र आठवले तर मनाला चटका लागून डोळ्यात टचकन पाणी येतं. मंत्री महोदय मात्र सेल्फी काढण्यात मग्न आहेत. यांना लाज कशी वाटत नाही. मुख्यमंत्री या संवेदनशील वागण्याची दखल घेणार का?, असा प्रश्न धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे.