जळगाव – राज्यात असणारे शिवकालीन गडकिल्ले भाड्याने देण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयाचा जाहीर निषेध आज शिवतीर्थ मैदान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे घोषणाबाजी देऊन करण्यात आला .
यावेळी मोर्चाचे राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष गणेश पाटील,दीपक पाटील,आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हॉटेल व्यावसायिकांना 25 गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून घेण्यात आला असून तशी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे . महामंडळाच्या या कृतीचा निषेध आज मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आला .