खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या भक्कम पाठपुराव्याला यश :लवकरच होणार भव्य तीन मजली न्यायमंदिर : सोशल मीडियावर खासदार उन्मेशदादा पाटील यांचे सर्वत्र कौतुक
चाळीसगाव – जिल्हयात भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा असलेल्या चाळीसगाव तालुक्यात तत्कालीन आमदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नाने २०१८ साली वरिष्ठ स्तर न्यायालय मंजूर झाले होते. याचबरोबर न्यायालयाच्या परिसरात विस्तारीत इमारत साकारली जावी यासाठी चाळीसगाव वकील संघाने तत्कालीन आमदार उन्मेश दादा पाटील यांचे कडे वाढत्या खटल्याची संख्या ,पक्षकारांची वाढती वर्दळ पाहता तसेच सध्याची जागा अपूर्ण पडत असल्यामुळे विस्तारित इमारतीची मागणी केली होती. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी तेंव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे इमारतीच्या निधीसाठी सतत पाठपुरावा सुरूच ठेवला होता .
गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेवून चाळीसगाव न्यायालयासाठी निधी मंजूरी साठी प्रयत्न केले आणि निवेदन दिले होते.त्याअनुषंगाने आज चाळीसगाव न्यायालयाच्या इमारतीच्या शेजारी विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी चार कोटी नव्वद लाखांचा निधी मंजूर झाल्याने तालुक्यातून व जिल्हाभरातून केंद्रीय पेट्रोलीयम आणि प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेश दादा पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, पालकमंत्री गुलाबराव पाटील याचे आभार मानले आहेत.














