Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक ! बड्या घरच्या २ उच्चशिक्षित महिलांची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
February 5, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
खळबळजनक ! बड्या घरच्या २ उच्चशिक्षित महिलांची आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

नांदेड : शहरात एकाच दिवशी उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबातील वेगवेगळ्या दोन विवाहितांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.  शिल्पा गजानन जीरोनकर व अनुपा सागर मापारे असे आत्महत्या केलेल्या दोन्ही महिलांचे नाव आहे. दोघीही उच्चशिक्षित चांगल्या कुटुंबातील या महिलांनी मृत्यूला कवटाळल्याने हळहळ व्यक्त कऱण्यात येत आहे. या दोन्ही आत्महत्येमागचं कारण शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

यात पहिली घटना ही शहरातील विवेकनगर भागातील आहे. गजानन जीरोनकर हे व्यवसायाने वकील असलेले आपल्या कुटुंबासह इथे स्वतःच्या घरात राहतात. याच घरात त्यांची पत्नी शिल्पाचा बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. विशेष म्हणजे शिल्पाच्या मुलाचा आज वाढदिवस होता, त्या वाढदिवसाची तयारी घरात करण्यात आली होती. त्या दरम्यान शिल्पाने बाथरूम मधल्या शॉवरला गळफास लावत जीवन संपवलं.

आत्महत्येपूर्वी शिल्पाने एक पत्र लिहिले असून पोलिसांनी ते हस्तगत केले असून त्यात काय लिहिलं ते सांगण्यास नकार दिला आहे. दरम्यान, मयत शिल्पाच्या भावाच्या तक्रारीवरून पती गजानन जीरोनकरला अटक करण्यात आली आहे. मयत शिल्पाच्या भावाने शिल्पाचा माहेरावरून पैसे आणण्यासाठी सासरचे मंडळी तिचा छळ करत असल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी शिल्पाच्या पतीला भाग्यनगर पोलिसांनी अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.

आत्महत्येची दुसरी घटना ही उचभ्रू वस्तीतील शिवाजीनगरची आहे. शहरातील प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ असलेल्या अर्जुन मापारे यांच्या सुनेने आत्महत्या केल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दंतरोग तज्ञ असलेले सागर मापारे हे वाडिया फॅक्टरी भागात पत्नी मुलांसह राहतात. त्यांच्या पत्नी अनुपा यांनी काल दुपारी मुलांना खायला घालून त्या आपल्या रूममध्ये गेल्या. आई बराच वेळ झाली तरी बाहेर आली नसल्याने मुलांनी दरवाजा ठोटावला. मात्र, आईने प्रतिसाद दिला नाही. त्या नंतर मोलकरणीने खिडकीतून पाहिले असता अनुपा या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. दरम्यान, अनुपा यांनी आत्महत्या का केली त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

आत्महत्येच्या या दोन्ही घटनांतील महिला या चांगल्या कुटुंबातील आहेत. यातील शिल्पा जीरोनकर ही ३२ वर्षीय असून तिला एक मुलगा आहे. तर अनुपा या देखील ३५ वर्षाच्या असून त्यांनाही दोन अपत्य आहेत. दोघीही उच्चशिक्षित चांगल्या कुटुंबातील या महिलांनी मृत्यूला कवटाळल्याने हळहळ व्यक्त कऱण्यात येत आहे. या दोन्ही आत्महत्येमागचं कारण शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खाद्य तेल स्वस्त होणार ; काय आहे कारण जाणून घ्या…

Next Post

Vi-Airtel-Jio कडून सर्वात स्वस्त प्लॅन ! कमी किमतीत मिळेल हाय-स्पीड डेटासह ‘हे’  

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

August 18, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
Next Post
Jio-Airtel-Vi चा धमाका! जाणून घ्या कोणाचा प्लान आहे बेस्ट

Vi-Airtel-Jio कडून सर्वात स्वस्त प्लॅन ! कमी किमतीत मिळेल हाय-स्पीड डेटासह 'हे'  

ताज्या बातम्या

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

November 23, 2025
जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

November 21, 2025
जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 20, 2025
नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

November 12, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us