Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोल्हापूरसह सांगलीतील आतापर्यंत अडीच लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले !

najarkaid live by najarkaid live
August 9, 2019
in राज्य
0
कोल्हापूरसह सांगलीतील आतापर्यंत अडीच लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले !
ADVERTISEMENT
Spread the love

  • पूरपरिस्थितीवर नियंत्रणासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न
  • आतापर्यंत अडीच लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
  • स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, नौदल, सैन्यदल व हवाईदलाची पथके कार्यरत

मुंबई, दि. 9 : कोल्हापूर व सांगलीतील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून केंद्र शासनाकडूनही मदत घेण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे राज्य शासनाच्या संपर्कात असून केंद्राकडून लागेल ती मदत करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. बचाव पथकाने आतापर्यंत 2 लाख 52 हजार 813 जणांना सुरक्षित स्थळी हलविले असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.
कोल्हापूर व सांगलीमध्ये जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाचे जवानासह महसूल, जलसंपदा, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह इतर सर्व विभागाचे कर्मचारी व अधिकारी अहोरात्र पूरग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून राबत आहेत. स्थानिक प्रशासनाबरोबरच ओडिसा, पंजाब व गुजरात राज्यातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे 22 तसेच नौदलाच्या 26, तटरक्षक दलाचे सांगलीमध्ये 2 व कोल्हापुरात 9 पथके, सैन्यदलाचे 8 पथके, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे सांगलीमध्ये दोन तर कोल्हापुरात एक अशी तीन पथके कार्यरत आहेत. तसेच कोल्हापुरात 76 तर सांगलीमध्ये 90 बोटींद्वारे बचाव कार्य सुरू आहे.

पूरपरिस्थितीबद्दल राज्य शासनाने केंद्र शासनाशी तत्काळ संपर्क साधल्यामुळे सैन्य दलाची व तटरक्षक दलाची पथके कार्यरत झाली आहेत. मदत व पुनर्वसन विभागाचे आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असून वेळोवेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाबरोबर मदती संदर्भात संपर्कात आहे.
सध्या कर्नाटकातील आलमट्टी धरणातून आज दुपारपर्यंत 4 लाख 50 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असून त्यामुळे कोल्हापुरातील पाणी पातळी कालच्या पेक्षा कमी झाली आहे. तसेच सांगलीतील पाणी पातळी स्थिर आहे. पाऊस कमी झाल्यानंतर या ठिकाणची पाणीपातली आणखी कमी होण्यास मदत होईल.
पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्य शासनाने 154 कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यातून ग्रामीण भागातील आपत्तीग्रस्त नागरिकांना प्रति कुटुंब 10 हजार तर शहरी भागातील प्रति कुटुंब 15 हजार रुपये मदत करण्यात येणार आहे. ही मदत तातडीने वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 239 गावे व सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 90 गावे अशी 12 तालुक्यातील 329 गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. पुरामुळे बाधित गावातील दोन लाख 52 हजार जणांना बचाव पथकानी सुरक्षितस्थळी हलविले असून विविध 270 ठिकाणी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातील सांगलवाडी व हरिपूर येथे एनडीआरएफ व एसडीआरएफची टीम बचाव कार्य सुरू करत आहेत. सांगलवाडीत वीस ते बावीस बोटीद्वारे बचावकार्य सुरू आहे. तसेच एअरलिफ्टिंगने नागरिकांना हलविण्यात येत आहे. तर हरिपूरमध्येही बोटीतून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मिरज, पलूस व वाळवा तालुक्यातही प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्या राहण्याची, जेवणाची व औषधोपचाराची सोय केली आहे. याबरोबरच जनावरांच्या बचावासाठीही प्रयत्न सुरू आहेत. कवलापूर येथे तीन हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू आहे.
पूरग्रस्त भागात अन्न पाकिटे, पिण्याचे पाणी तसेच औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. कोल्हापूर शहरामधील पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. तसेच ज्या ठिकाणी अद्याप पाणी आहे तेथील नागरिकांना सुखरुप काढण्यात येत असून वृद्ध व आजारी नागरिकांना प्राधान्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. तसेच जे नागरिक उंचावर सुरक्षित ठिकाणी आहेत, त्यांना फळे, अन्न पाकिटे व पाणी पुरवठा करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे कोल्हापुरात स्वतः सर्वत्र पोचून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच वेगवेगळ्या संस्थांकडून येणाऱ्या मदतीचे नियोजन करण्याचे काम करत आहेत. तसेच पूरग्रस्तांना ठेवण्यात आलेल्या तात्पुरत्या निवासस्थानी श्री. पाटील हे स्वतः जाऊन तेथील नागरिकांची चौकशी करत आहेत. तसेच आवश्यक तेथे अन्न, औषधे व इतर साहित्याचा पुरवठा करण्यासंदर्भात योग्य ती पावले उचलत आहेत.
श्री. पाटील म्हणाले की, कोल्हापुरातील पूरपरिस्थिती सामान्य करण्याचे काम वेगाने सुरू आहे. शिरोळ तालुक्यात मदतीसाठी पथके पाठविण्यात आली आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी राज्य व केंद्र शासन सर्व मार्गाने प्रयत्न करत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ. पायल आत्महत्याप्रकरणी तिघांना अटीशर्तींसह जमीन मंजूर

Next Post

पांझरा नदीपात्रातून 49 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग :अमळनेर तालुक्यातील मुढी गावात शिरले पाणी !

Related Posts

Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील 'तो' प्लॅट तीन वर्षासाठी सील!

Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील ‘तो’ प्लॅट तीन वर्षासाठी सील!

July 29, 2025
क्राईम न्यूज

विजेचा करंट देत पतीची हत्या केली,मृतदेहाजवळचं शारीरिक…घटनेने समाजमन सुन्न!

July 29, 2025
PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

July 29, 2025
PM Dhan Dhanya Krushi Yojana 2025: शेतकऱ्यांना 20,000 रुपये अनुदान, 24,000 कोटींचा निधी मंजूर

PM Dhan Dhanya Krushi Yojana 2025: शेतकऱ्यांना 20,000 रुपये अनुदान, 24,000 कोटींचा निधी मंजूर

July 29, 2025
Pune Rave Party: एकनाथ खडसेंची पुण्यात पत्रकार परिषद,पोलिसांवर थेट गंभीर आरोप

Pune Rave Party: एकनाथ खडसेंची पुण्यात पत्रकार परिषद,पोलिसांवर थेट गंभीर आरोप

July 29, 2025
Kawad Yatra Bus Accident : भीषण कावड यात्रा अपघात: १८ भाविकांचा मृत्यू!

Kawad Yatra Bus Accident : भीषण कावड यात्रा अपघात: १८ भाविकांचा मृत्यू!

July 29, 2025
Next Post
डॉ. पायल आत्महत्याप्रकरणी तिघांना अटीशर्तींसह जमीन मंजूर

पांझरा नदीपात्रातून 49 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग :अमळनेर तालुक्यातील मुढी गावात शिरले पाणी !

ताज्या बातम्या

Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील 'तो' प्लॅट तीन वर्षासाठी सील!

Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील ‘तो’ प्लॅट तीन वर्षासाठी सील!

July 29, 2025
Anubhuti School Nashik Award:  प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

Anubhuti School Nashik Award: प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

July 29, 2025
जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन - अतुल जैन यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

July 29, 2025
जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

July 29, 2025
Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

July 29, 2025
क्राईम न्यूज

विजेचा करंट देत पतीची हत्या केली,मृतदेहाजवळचं शारीरिक…घटनेने समाजमन सुन्न!

July 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us