Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करुनच शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी – उपमुख्यमंत्री अजित पवार

najarkaid live by najarkaid live
April 18, 2020
in राज्य
0
कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करुनच  शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी  – उपमुख्यमंत्री अजित पवार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. १८ :-  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत तीन मे पर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत. राज्यात टाळेबंदीचे काटेकोर पालन यापुढेही सुरु राहील, त्याचबरोबर नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरु व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक    नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. सोमवार दिनांक  २० एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी  होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  आज दिली.

देशात जाहीर टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नागरिकांनी  त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केल आहे.

मार्गदर्शक नियमावलीनुसार ग्रामीण भागातील उद्योग, निवडक व्यवसाय, व्यापारी आस्थापनांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर परवानगी देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी  स्पष्ट केले.  राज्यात टाळेबंदीची मुदत वाढवण्यात आली असली  तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यापुढेही  नियमित सुरु राहील, त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. नागरिकांना, कोरोना प्रसार रोखण्यासाठी घरातच थांबावे, घराबाहेर पडू नये, सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, टाळेबंदीसंदर्भात केंद्राच्या सूचनांचे राज्यात काटेकोर पालन करण्यात येत आहे. टाळेबंदी लागू असली तरी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी आहे. दवाखाने, हॉस्पिटल, औषधांची दुकाने, पॅथोलॉजी सेंटर, ॲम्बुलन्स सेवा सुरु आहेत. शेतीच्या मशागतीच्या कामांवरही कोणतही बंधन नाही. शेती आणि शेती उद्योगाशी संबंधीत सर्व कामे, दुकाने, व्यवहार सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरु ठेवण्यास परवानगी  देण्यात आली आहे. तूर, कापूस, हरभरा खरेदी योजना देखील सुरु राहणार आहे. दूधव्यवसाय, पशुपालन, मत्स्योद्योगविषयक कामांनाही परवानगी आहे. रोजगार हमी योजनेची कामे सुरु राहणार आहेत. अनाथालये, वृद्धाश्रम आदी सामाजिक संस्थांचे कामकाजही सुरु राहील. अंगणवाड्या बंद असल्या तरी बालकांना पोषणआहार घरपोच दिला जाणार आहे. शाळा, कॉलेज बंद असली  तरी ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यास सांगण्यात आले आहे. बँका, वित्तीय संस्थांचे व्यवहार सुरु राहणार असले तरी नागरिकांनी तिथे गर्दी करु नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. राज्यातील कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी टाळेंबंदीला सर्वांनी सहकार्य करावे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये अंतर राखावं, घरातूनच काम करा, घरातच रहा, सुरक्षित रहा, टाळेबंदीचे पालन करा असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सैयदना बुरहानी ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची मदत

Next Post

पाचोरा नगरपरिषदे तर्फे कोरोना विषाणू पासून बचावासाठी स्‍वच्‍छता कर्मचा-यांना सुरक्षा साहित्‍य वाटप

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
पाचोरा नगरपरिषदे तर्फे कोरोना विषाणू पासून बचावासाठी स्‍वच्‍छता कर्मचा-यांना सुरक्षा साहित्‍य वाटप

पाचोरा नगरपरिषदे तर्फे कोरोना विषाणू पासून बचावासाठी स्‍वच्‍छता कर्मचा-यांना सुरक्षा साहित्‍य वाटप

ताज्या बातम्या

Fundamental Rights in Indian Constitution भारतीय संविधानातील ६ मौलिक अधिकार सविस्तर माहिती

March 19, 2026
Share Market : शेअर बाजारात भीषण पडझड! सेन्सेक्स 1600 अंकांनी कोसळला, निफ्टीत 500 अंकी घसरण

नागपुरात गुढीपाडवा उत्साहात; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा शोभायात्रेत सहभाग

निवडणुकांसाठी काँग्रेसची रणनिती ठरवण्यासाठी दिल्लीत महत्त्वाची बैठक

Central Railway : सेंट्रल रेल्वे 51 पदांसाठी भरती ,परीक्षा नाही

Weather News: महाराष्ट्रात पावसाचा कहर, गारपीट...शेतकरी आणि नागरिक हवालदिल

Weather News: महाराष्ट्रात पावसाचा कहर, गारपीट…काही जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us