Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोना काळात १०६ पत्रकारांचा मृत्यू ; सरकारनं मदत केली नाही – वसंतराव मुंडे

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विभागीय व जिल्हाध्यक्षांच्या कामकाजाची आढावा बैठक उत्साहात

najarkaid by najarkaid
October 5, 2021
in Uncategorized
0
वसंतराव मुंडे
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद,(प्रतिनिधी)- कोरोनाच्या काळात १०६ पत्रकारांचा मृत्यू झाला. सरकारने एकाही पत्रकाराला मदत केली नाही. पण आपण, राज्य पत्रकार संघाने तत्काळ मदत केली .हा राज्यातील एकमेव पत्रकार संघ आहे जो कायम पत्रकारांच्या पाठिशी राहतो. त्यामुळे तुम्ही आपल्या भागात संघटना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी जाईल, या दृष्टिकोनातून काम करा.संघटनेत काम करताना संपर्क फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी यापुढे विभागात व जिल्ह्य़ात मेळावे,बैठका घ्या. जिल्ह्य़ातील ज्येष्ठ पत्रकारांना सोबत घ्या, त्यांचे मार्गदर्शन घेऊन विविध समाजउपयोगी उपक्रम राबवा म्हणजे लोक जोडल्या जातील.त्यामूळे संघटना वाढेल व आपलीही ताकद वाढेल. हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. 20 वर्षांपूर्वी मी या संघटनेत शहर सचिव म्हणून प्रवेश केला.आज राज्याचा अध्यक्ष आहे.हा प्रवास करताना मी संघटना वाढवत गेलो आणि सोबत मी वाढलो,असे सांगून मुंडे यांनी पदाधिकाऱ्यांना संघटनेसाठी झोकून देऊन काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी पुढे बोलताना वसंत मुंडे म्हणाले की,हवा दिसत नाही पण ती असते संघटनेचे कामही तसेच असते. त्यामुळे काम करत रहा, कामातून प्रभाव तयार होतो आणि पदाधिका-यांनी संघटनेसाठी केलेल्या कामातूनच संघटनेची ओळख निर्माण होते ,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या औरंगाबादेतील विभागीय कार्यालयात पत्रकार संघाच्या विभागीय व जिल्हाध्यक्षांच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर राज्य सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांची उपस्थिती होती. बैठकीचा शुभारंभ बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व कोरोनातील शहीद पत्रकारांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विश्वास आरोटे म्हणाले की, संघटनात्मक कार्य करताना शिस्त महत्त्वाची आहे.त्यामुळेच अनेक वेळा काही निर्णय घेताना कुणाचे मन दुखावल्या जाते.तेव्हा संबंधितांनी एक लक्षात घेतले पाहिजे की,कुठलाही निर्णय एकट्याचा नसतो.तो कोअर कमिटी घेत असते.तेव्हा संघटनेचे हीत डोळ्यासमोर ठेवले जाते.त्यामूळे संघटनेपेक्षा कोणीही महत्वाचा नसतो आणि आपण हे लक्षात घेऊन काम करत आहोत म्हणूनच आज आपली संघटना वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वेगाने प्रगती करत आहे,असे शेवटी आरोटे म्हणाले.

या बैठकीला विभागीय अध्यक्ष- वैभव स्वामी, बाळासाहेब देशमुख, प्रा.महेश पानसे, सिद्धार्थ तायडे, जिल्हाध्यक्ष
नयन मोंढे, उदय नावडे, अनिरुद्ध एस. उगले, दिलीप केदारनाथ कोठावडे, प्रमोद पाणबुडे,अनिल गावंडे, बाजीराव शंकर फराकटे, अशोक भानुदास रेडे, सुधाकर सोपान फुले, दिगंबर उत्तमराव गुजर, धनंजय दिनकरराव पाटील, सुनील फुलारे, कुंडलिक चिमाजी बाळेकर, जुबिल दि. बोकडे, इरफान खान, प्रदीप शेंड, गजानन देशमुख, शरद प्रल्हाद नागदेवे, डॉ. प्रभू गोरे, उदय नवाडे, शांताराम भागीनाथ मगर, राजेश खोकडे, अनिल राहणे,विलास शिंगी,मुकेश मुंदडा,छबुराव ताके,मनोज पाटणी,दिपक मस्के,अभय विखणकर,शिवाजी गायकवाड, संजय व्यापारी ,दिपक काकडे आदिंची उपस्थिती होती.विभागीय व जिल्हाध्यक्षांनी आपल्या कार्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्याकडे सादर केला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन स्नेहा साळवे हिने केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धबधब्याखाली आंघोळ करणे महागात पडले ; तरुणाचा बुडून मृत्य

Next Post

पोलिस अधीक्षक प्रविण मुंडे यांची बोदवड पोलीस स्टेशनला भेट

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
पोलिस अधीक्षक प्रविण मुंडे यांची बोदवड पोलीस स्टेशनला भेट

पोलिस अधीक्षक प्रविण मुंडे यांची बोदवड पोलीस स्टेशनला भेट

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us