नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठी संधी चालून आलीय. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत केंद्र सरकारच्या अधिनस्त विविध मंत्रालये/ विभाग/ संस्थांच्या आस्थापनेवरील गट “ब” आणि गट “क” संवर्गातील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ८ आक्टोबर २०२२ पर्यंत करायचा आहे.
या पदांसाठी होणार भरती?
सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी, सहाय्यक, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी, उपनिरीक्षक, सहाय्यक/ अधीक्षक, विभागीय लेखाकार, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, लेखाकार/ कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ वरिष्ठ लिपिक आणि कर सहाय्यक पदांसाठी जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधारक असणे अवश्यक आहे. (कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी पदांसाठी इय्यता बारावी आणि पदवीत गणित विषयांमध्ये किमान ६०% गुण आवश्यक आहेत.)
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी सहाय्यक व निरीक्षक पदांकरिता १८ ते ३० वर्ष किंवा २० ते ३० वर्ष आणि सहाय्यक विभाग अधिकारी, उपनिरीक्षक पदांकरिता २० ते ३० वर्ष दरम्यान असावे. तसेच सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी, प्राप्तिकर निरीक्षक, निरीक्षक (उत्पादन शुल्क), सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, निरीक्षक, सहाय्यक/ अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, सांख्यिकीय अन्वेषक (श्रेणी-२) पदांकरिता कमाल वय ३० वर्ष आणि कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी पदांकरिता ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे, तर लेखापरीक्षक पदाकरिता १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे.
परीक्षा फीस
सर्वच प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा फीस १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ माजी सैनिक/ महिला प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख
दिनांक ८ आक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
हे पण वाचा :
10वी पास उमेदवारांना भारतीय पोस्टात नोकरीची संधी..
पदवी पाससाठी खुशखबर.. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1673 रिक्त पदांची भरती
भारतीय हवामान विभागात ‘या’ पदांसाठी मोठी भरती ; इतका पगार मिळेल
नोकरीची मोठी संधी… 10वी ते ग्रॅज्युएट उत्तीर्णांसाठी मुंबईत 1041 जागांसाठी भरती
अर्ज प्रक्रिया
सर्वप्रथम उमेदवारांना प्रथम विभागाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in. ला भेट द्यावी लागेल.
अधिकृत वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करण्याचा पर्याय दिसेल.
त्यानंतर कॅप्चा कोड टाका.
पुढील प्रक्रियेत तुमच्या समोर “Apply Now button-SSC CGL ”उपलब्ध पर्यायावर क्लिक करा.
SSC CGL परीक्षा टॅबवर जा आणि “Apply Now” Option वर क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला SSC CGL परीक्षा अर्जावर पुनर्निर्देशित केले जाईल.
आता वैयक्तिक माहिती किंवा आवश्यक कागदपत्रे भरून पुढे जावे लागेल.
पुढील चरणात, उमेदवारांना त्यांचे परीक्षा केंद्र निवडावे लागेल .
सर्व तपशील भरल्यानंतर, एकदा ते तपासण्याची खात्री करा.
कारण SSC तुमचा अर्ज पुन्हा बदलासंधी देणार नाही.
फोटो आणि स्वाक्षरी पात्रतासह अपलोड करा.
शेवटच्या टप्प्यात, उमेदवारांना त्यांचे अर्ज शुल्क भरून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
















