Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कामांचा दर्जा व गुणवत्ता राखण्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न ; विभागनिहाय कामांचा घेतला आढावा

najarkaid by najarkaid
January 21, 2021
in जळगाव
0
कामांचा दर्जा व गुणवत्ता राखण्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,दि. 21 – जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करण्यात येणारी कामे ही जिल्ह्याच्या विकासात भर घालणारी ठरावी, याकरीता प्रत्येक विभागामार्फत करण्यात येणारे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेत.
जिल्हा वार्षिक योजना खर्च आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक विवेक होशिंग, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे विभागपमुख उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरीता शिक्षण, आरोग्य, सिंचन, वीजेबरोबरच नागरीकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले जावे. याकरीता पोलीस व तुरुंग विभागास 1 कोटी 53 लाख रुपयांची तरतुद प्रस्तावित करण्यात आली आहे. यामधून पोलीस विभागास 20 नवीन वाहने खरेदीचा प्रस्ताव सादर करावा. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरीता क्रीडांगण विकास कार्यक्रमांतून शाळांमध्ये मैदाने तयार करावीत. तरुणांना व्यायामाची गोडी निर्माण व्हावी, याकरीता गावांमधील व्यायामशाळांना चांगल्या दर्जाचे व्यायामाचे साहित्य उपलब्ध करुन द्यावे. तसेच नागरीकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरीता जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी व साधनसामुग्री उपलब्ध राहील याकरीता प्रस्ताव सादर करावेत.शेतीला पुरेशी वीज उपलब्ध होईल याकरीता आवश्यक ती सामुग्रीचेही प्रस्ताव सादर करावेत. शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पशुवैद्यकीय दवाखान्यांचे बळकटीकरण करण्यात यावे. दलीतवस्तीत अभ्यासिका उभारण्याबरोबरच नागरी सुविधांचा विकास व पर्यटनस्थळांच्या विकासाला प्राधान्य द्यावे याकरीता यावर्षी भरीव तरतुद करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संबधित यंत्रणांनी तातडीने प्रस्ताव सादर करावे. विभागामार्फत होणारे काम निकृष्ट आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत असलेल्या मागील वर्षातील प्रलंबित कामांचाही आढावा घेऊन सदरची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना दिल्यात.
सर्व संबधित विभागांनी कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठीचे प्रस्ताव तातडीने सादर करावे, अपूर्ण कामे वेळेत पूर्ण होतील याचे नियोजन करतानाच यावर्षी कामांची निवड करतांना विकासात्मक कामांची निवड करण्याची सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केली.
जिल्हा वार्षिक योजनेतून शासनाच्या निर्देशानुसार आतापर्यंत कोविडच्या उपाययोजनांसाठी 61.87 कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली असून 48.44 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तर 26.70 कोटी रुपयांचा निधी संबंधित यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर सन 20-21 मध्ये जिल्ह्याला सर्वसाधारण, अनुसुचित जाती, जमाती उपयोजनांसाठी 513 कोटी 43 लाख रुपयांचा नियतव्यव मंजूर असून अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यास याप्रमाणे निधी बीडीएसवर प्राप्त झाला आहे. तर 50.26 कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडून वितरीत करण्यात आला असून 41.18 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी बैठकीत दिली.
00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण करण्याला प्राधान्य

Next Post

शासनाच्या लोककल्याणकारी योजना व कोविड-19 जनजागृती कार्यक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
शासनाच्या लोककल्याणकारी योजना व कोविड-19 जनजागृती कार्यक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

शासनाच्या लोककल्याणकारी योजना व कोविड-19 जनजागृती कार्यक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us