जळगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दिव्यांगांना एकत्र करून दरवर्षी 31 डिसेंबर रोजी सर्वोच्च कळसुबाई शिखरावर घेऊन जाण्याचा उपक्रम शिवुर्जा प्रतिष्ठान मार्फत राबविला जातो शिवराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गाडे स्वतः पोलिओग्रस्त दिव्यांग असून ते वर्षभर अशा सहा गडदुर्ग भटकंतीचे आयोजन करत असतात. कळसूबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून या शिखरावर जाण्याची आवड व स्वप्न प्रत्येक दिव्यांगांचे असते परंतु लागणारा वेळ सुरक्षितता व येणारा मोठा खर्च पाहता दिव्यांग कळसुबाई शिखरावर जाण्याचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. या दिव्यांगाच्या ऊर्जा इच्छाशक्तीला शिवुर्जा प्रतिष्ठान तर्फे गेल्या नऊ वर्षांपासून नियमित प्रेरणा देण्याचे कार्य सुरू आहे. या अनोख्या मोहिमेसाठी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील रहिवाशी मनोज श्रावण तेली हे सहभागी झाले होते.
यापूर्वी आठ वेळेस कळसुबाई शिखरावर दिव्यांगांच्या ऊर्जा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील राबवलेल्या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील 102 दिव्यांनी सर्वोच्च कळसुबाई शिखर सर केले आहे यावर्षी देखील येथील डिसेंबर 2020 रोजी राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी एकत्र येत कळसुबाई शिखर सर केले. महाराष्ट्रातील सहभागी सर्व दिव्यांग कळसुबाई पायथ्याच्या जहांगीरदारवाडी या गावात विविध मार्गाने व साधनाने मच्छू खाडे या दिव्यांग व्यक्तीच्या घरी एकत्र आले. 31 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता कळसुबाई शिखर चढाईला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव व कळसुबाई माते की जय अशा घोषणा देत हे सर्व दिव्यांग श्री पुरुष एकमेकांना आधार देत रात्री सात वाजता पर्यंत कळसुबाई माथा गाठला. रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत व सोसाट्याच्या वार्यात तंबूमध्ये मुक्काम ठोकून 1 जानेवारी रोजी कळसुबाई मातेचे दर्शन घेतले. यानंतर नवीन वर्षाच्या नवीन उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. सकाळी ठीक दहा वाजता शिखर करण्यात करण्यात सुरुवात करण्यात आली आणि अवघ्या तीन तासात दुपारी एक वाजता पायावरील जहांगीरवाडी गाव गाठले. या दिव्यांग शिखर ऊर्जा मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील तब्बल वीस जिल्ह्यातील सर्व प्रकारे दिव्या सहभागी झाले होते. सहभागी सर्व दिव्यांगांना शिवुर्जा प्रतिष्ठान तर्फे कळसुबाई शिखर केल्याबद्दल प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात आले.
















