Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कला, कार्यानुभव विषयांनाही महत्व द्या- गट शिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे

najarkaid by najarkaid
November 30, 2019
in Uncategorized
0
कला, कार्यानुभव विषयांनाही महत्व द्या- गट शिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे
ADVERTISEMENT

Spread the love

शेळावे – येथून जवळ असलेले जि.प.प्राथमिक शाळा राजवड ता पारोळा या ठिकाणी शेळावे केंद्राची चौथी शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. या परिषदेच्या अध्यक्ष गट शिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे व प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणुन शालेय पोषण आहार अधिक्षिका श्रीमती प्रिती पवार, बहादरपूर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी, शेळावे केंद्र प्रमुख जितेद्र पवार, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष नागेश परदेशी, मुख्याध्यापीका पाकीजा पटेल उपस्थित होते.

वरील मान्यवरांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच त्यांचे व सर्व शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. यावेळी धाबे शाळेचे गुणवंतराव पाटील यांना म.जोतीराव फुले गुरू गौरव शिक्षक पुरस्कार व राजवड हायस्कुलच्या श्रीमती बबीता पटेल यांना भारतरत्न मौलाना आझाद गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अगोदर राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या व शाळेच्या मुख्याध्यापिका पाकिजा पटेल यांच्या इयत्ता 4 थी च्या विद्याार्थ्यांनी बनविलेल्या कला व कार्यानुभव विषयाच्या विविध वस्तुंचे प्रदर्शन मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून सर्वांना दाखविण्यात आले.

कै. यशवंत धोंडु पाटील यांच्या स्मरणार्थ रावसाहेब दिलीप यशवंत पाटील यांनी शाळेला  डीजीटल साठी टिव्ही संच दिला म्हणुन रावसाहेब दिलीप यशवंत पाटील यांचा सत्कार व आभार मानण्यात आले. या प्रदर्शनात तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि शाळेने निवडलेल्या आदर्श विद्यार्थी अशा अकरा विद्यार्थ्यांना धाबे शाळेचे मुख्याध्यापक राज्य आदर्श शिक्षक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांच्या कडुन विविध शैक्षणिक साहित्य बक्षिस देण्यात आले. शाळेच्या शिक्षकांनी आदर्श परिपाठ सादर केला. श्रीमती वैशाली बोरसे यांनी इ 1 ली च्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा ज्ञान रचनावादी आदर्श पाठ घेतला.

अध्ययन स्तर निश्चिती यावर श्रीमती वैशाली सोनवणे यांनी आपले अभ्यासपुर्ण मत मांडले. मुल्य शिक्षणावर श्रीमती पाकिजा पटेल यांनी सखोल मार्गदर्शन केले. श्रीमती प्रिती पवार यांनी हिवाळ्यातील सकस आहार बालकांना कसा दयावा या विषयी माहिती दिली. विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी यांनी स्थलांतरीत विदयार्थी त्यांचे शिक्षण व शिक्षण हमी कार्ड बाबत मार्गदर्शन केले.

आपल्या अध्यक्षिय भाषणात श्रीमती कविता सुर्वे म्हणाल्या की, कला व कार्यानुभव विषयाचे प्रदर्शन बघुन आनंद वाटला. टाकावू वस्तूंपासून टिकावु वस्तु बनविण्याची विद्यार्थ्यांची कला सुंदर आहे. यामुळे त्यांच्या कल्पनाशक्ती व सृजनशीलतेला वाव मिळुन त्यांची नवनिर्मितीची क्षमता वाढते,  म्हणून या विषयांनाही इतर विषयांइतकेच महत्व द्यावे. प्रास्ताविक व सुत्रसंचलन श्रीमती पाकिजा पटेल तर आभार रघुनाथ सरदार यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आठ लाख ७० हजाराचा कापूस चोरी प्रकरणी चार जण अटकेत

Next Post

उपमुख्यमंत्री कोण, हे २२ डिसेंबरनंतर ठरेल: पटेल

Related Posts

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

March 21, 2026
Next Post
उपमुख्यमंत्री कोण, हे २२ डिसेंबरनंतर ठरेल: पटेल

उपमुख्यमंत्री कोण, हे २२ डिसेंबरनंतर ठरेल: पटेल

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us