
जळगांव दि .१o ( प्रतिनिधी ) :पोलीस अधीक्षक डॉ . पंजाबराव उगले यांनी ०६ ऑगष्ट रोजी अचानक पणे जळगाव शहरात शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून लावण्यात आलेले पाईंट तपासले असता तपासणी दरम्यान कर्तव्यात कसूर करणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात बदली करून उचलबांगडी केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, पोलीस अधीक्षक डॉ . पंजाबराव उगले यांनी ०६ ऑगष्ट रोजी अचानक पणे जळगाव शहरात शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून लावण्यात आलेले पाईंट तपासले असता प्रभात चौकातील पॉईंट वर कर्तत्वावर असलेले पो कॉ . २०७१ सुनील देवीसिंग नाईक हे कर्तव्यावर कसुरी करताना मिळून आले होते या सोबतच आज सकाळी १०:०० वाजता त्यांनी अचानक पणे शहर वाहतूक नियंत्रणशाखेस भेट दिली असता रात्रीं ठाणे अंमलदार ड्युटीस असलेले सहाय्यक फौजदार ३०० किसन रघुनाथ श्रीखंडे यांनी नोंदणी नुसार ड्युटी चा चार्जे हा महिला पोलीस हवालदार २६७५ जरीना कलिंदर तडवी यांना दिला होता . परंतु प्रत्यक्षात ड्युटीवर पोना . २३१२ संघपाल राजाराम तायडे हे आढळून आले होतें . सदर कार्मचारी यांनी वरिष्ठांना कोणतीही पुर्व सूचना न देता आपसात ड्युटी वाटून घेतल्याचे आढळून आले होते . म्हणुन १) सहाय्यक फौजदार ३०० किसन रघुनाथ श्रीखंडे , २) महिला पोलीस हवालदार २६७५ जरीना कलिंदर तडवी ,३) पोना . २३१२ संघपाल राजाराम तायडे व ४) पो कॉ . २०७१ सुनील देवीसिंग नाईक यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे .















