मुंबई,(प्रतिनिधी)- एनआयएने सचिन वझे यांना मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील मिठी नदीवरील पुलावर, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात नेले असता सफाई कर्मचाऱ्याच्या मदतीने चार तासाची शोध मोहीम राबवत नदीतून एक संगणक सीपीयू, वाहनाची नंबर प्लेट आणि इतर अनेक वस्तू जप्त केल्या आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएनं मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी अनेक पुरावे नष्ट केल्याचा संशय एनआयए ला आहे. त्याबाबत सचिन वाझेची चौकशी सुरु आहे.मिठी नदीत काही पुरावे नष्ट केल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यानंतर एनआयएने या नदीमध्ये शोधमोहीम राबवली.
















