Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्योजक, राजकारणी, पत्रकार पुरुषोत्तम ठाकूर यांचे सामाजिक कार्य गौरवास्पद : वसंत मुंडे

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने मा.खा.उत्तमसिंह पवार यांच्या हस्ते पुरुषोत्तम ठाकूर यांचा सत्कार

najarkaid live by najarkaid live
March 26, 2023
in Uncategorized
0
उद्योजक, राजकारणी, पत्रकार पुरुषोत्तम ठाकूर यांचे सामाजिक कार्य गौरवास्पद : वसंत मुंडे
ADVERTISEMENT

Spread the love

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): सामाजिक भान राखत समाजात झपाटल्यासारखे कार्य करणार्‍या व्यक्तिमत्त्वात उद्योजक, राजकारणी तथा पत्रकार पुरुषोत्तम ठाकूर यांचे सामाजिक कार्य गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने उद्योजक, राजकारणी तथा पत्रकार पुरुषोत्तम रघुनाथसिंह ठाकूर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल जाहीर सत्कार शनिवार दि.25 मार्च रोजी मा. खा. उत्तमसिंह पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विभागीय कार्यालयात संपन्न झाला. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विगाचे प्रमुख दिनकर माने, मिलिंद दाभाडे, अफसर खान, सुभाष वानखेडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना वसंत मुंडे म्हणाले, पुरुषोत्तम ठाकूर यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी खूप मोठी आहे. त्यांचे पणजोबा मोठे जमीनदार, आजोबा भारतीय शस्त्रनिर्मिती कारखान्यात अधिकारी आणि वडील भारतीय सैन्यात लष्करी अधिकारी होते. वडिलांची देशसेवा जवळून बघताना पुरुषोत्तमरावांनी त्यातील सेवा या शब्दांचे मोल आपल्या अंगी उतरवले. अत्यंत कुशल संघटक आणि संघर्षांच्या बळावर त्यांनी यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत समाजसेवेचा पिंड मनापासून जोपासला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठांतून एम. ए. मास कम्युनिकेशन व पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेऊन आपल्या जीवनास एक वेगळा आयाम दिला.

नगरसेवक म्हणून सामाजिक कार्य करीत असताना जनसामान्यांच्या प्रश्‍नांवर ते सतत धावून आले. त्यांनी स्थानिक राजकारणात रस तर दाखवलाच. परंतु देशपातळीवरील एअर इंडियाचा देश पातळीवरील संप एकट्याने यशस्वीरित्या समेट घडवून आणला. त्या वेळेस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुरुषोत्तमरावांच्या कामाचा उल्लेख आमचा ठाकूर एकटा शिवसैनिक काय करू शकतो ते बघा असे कौतुक केले, ते आम्हा स्नेहीजणांना आनंददायी वाटते. त्याचबरोबर अगदी तरुण वयातच अल्पावधीत त्यांनी भूविकसक म्हणून संबंध शहर तसेच जिल्ह्यात नावलौकिक मिळवला.

सर्वसामान्य लोकांना उच्च दर्जाच्या भूकंपरोधक आणि कमी किमतीत परवडणा-या वास्तू निर्माण करून त्या विश्‍वासाने सुपूर्द केल्या हे उल्लेखनीय आहे. समाजभान जपत त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल अलीकडेच दिव्यमराठी वृत्तपत्र समूहाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. तो आमच्यासाठी गौरवास्पद आहे, असेही शेवटी मुंडे म्हणाले.

पुरुषोत्तम ठाकूर यांची बांधकाम क्षेत्रातील विश्‍वासार्हता गौरवास्पद : मा.खा.उत्तमसिंह पवार
आलीकडे सर्वच क्षेत्रातील विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण व्हावेत, अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. जे समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्या लोकप्रतिनिधींबद्दल सध्याची परिस्थीती सर्व काही सांगून जात आहे. आता पुन्हा राजकीय पटलावर जयप्रकाश चा उदय होईल का? असा प्रश्‍न उपस्थित करत राजकारणात राहूनही चांगल्या कामाच्या जोरावर पुरुषोत्तम ठाकूर यांनी कमी वेळात बांधकाम क्षेत्रात निर्माण केलेली विश्‍वासार्हता गौरवास्पद आहे असे मा.खा.उत्तमसिंह पवार यांनी सांगितले.

एखादी पत्रकार संघटना उद्योजक, राजकारणी आणि पत्रकार असलेल्या पुरुषोत्तम ठाकूर यांच्या सारख्या समाजभान असलेल्या व्यक्तीमत्वाचे गौरव करते म्हणजे ती एक सामाजिक चळवळच ठरते. कारण आज सर्वत्र लाभासाठीच चढाओढ सूरू आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी अशा कार्यक्रमातून समाजातील कर्तबगार लोकांना उर्जा देण्याचे कार्य यापुढेही असेच अखंडित सूरू ठेवावे. फेक न्यूज, टेबल न्यूज, पेड न्यूज आणि झोड न्यूजच्या नव्या जमान्यात पत्रकारांनी आपले सत्व कायम ठेवून समाजसेवेचा आपला वारसा जोमाने पुढे घेऊन जावा. राजकीय वातावरण कितीही गढूळ झाले तरी ते स्वच्छ करण्याची ताकद पत्रकारांमध्ये आहे असा विश्‍वासही यावेळी मा.खा.पवार यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी मनोज भारस्कर, शांताराम मगर, संतोष सुर्यवंशी, आकश ठाकूर, अनिस कुरेशी, विलास इंगळे, दिपक शेळके, श्रीनिवास झंवर, संतोष भुतेकर, महेश बुलगे, छबूराव ताठे, रवी वैद्य, मुकेश मुंदडा, मनोज पाटणी, गंगाधर कांबळे, बी. डी. तिगोटे, आर. एस. ठाकरे, गौरव जैस्वाल, रतनकुमार साळवे, प्रा. दिलीप महालिंगे, डॉ. किशोर शिरसाठ, डॉ. दयानंद कांबळे, संजय व्यापारी, संदीप घंटे, विलास शिंगी, बाळासाहेब जोगदंड, आदित्य बरांडे, परवेज बेजीन आदींची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कृषी मंत्रालयात अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी; जाणून घ्या पात्रता?

Next Post

कंपनीतून हाफ डे घेऊन गावी जाण्यासाठी निघाले, पण रस्त्यातच काळाने झडप घातली ;दोन मित्रांचा मृत्यू

Related Posts

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us