मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेलेल्या विशेष मुलाखतीचा ट्रेलर व्हिडीओ आज आपल्या ट्विट अकाउंट वरून शेअर करत उद्या धमाका… असं म्हटलं आहे.
या व्हिडीओ मध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारतांना कसं वाटतं आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून…, महाराष्ट्र तसं मोठं राज्य आहे, महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हात धुण्या पलीकडे काय सांगताय असे अनेक प्रश्न विचारतांना दिसत आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील आपल्या ठाकरे शैलीत उत्तरे देतांना दिसत आहे. ही मुलाखत विस्तृत उद्या पाहायला मिळणार असून राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने महत्वाची मानली जात असून विरोधकांचा देखील या मुलाखती मधून समाचार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे उद्या धमाका… पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.
















