Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उच्च कृषी तंत्रज्ञान अवलंबून भरघोस उत्पादन घ्या : डॉ. एच. पी. सिंग

najarkaid by najarkaid
December 15, 2019
in जळगाव
0
उच्च कृषी तंत्रज्ञान अवलंबून भरघोस उत्पादन घ्या : डॉ. एच. पी. सिंग
ADVERTISEMENT

Spread the love

जैन इरिगेशन व गजानन ठिबकतर्फे जळके येथे निर्यातक्षम केळी पीक परिसंवाद

जळगाव- शेतकऱ्यांनी उच्च कृषी तंत्रज्ञान, आधुनिक सिंचन स्वीकारून भरघोस उत्पादन घ्यावे व भारताच्या प्रगतीत हातभार लावावा असे आवाहन डॉ. एच. पी. सिंग यांनी केले. जळके येथील संत गजानन महाराज मंदीर परिसरातील शेतामध्ये आयोजित ‘निर्यातक्षम केळी पीक परिसंवाद’ उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांशी सुसंवाद साधताना ते बोलत होते. जैन इरिगेशन व गजानन ठिबक  जळके यांच्या संयुक्त विद्यमाने हा परिसंवाद आयोजला होता. यावेळी व्यासपीठावर श्री. गजानन ठिबक सिंचनचे संचालक पी. के. पाटील, तालुका कृषी अधिकारी झांबरे, प्रगतशील शेतकरी बी. ओ. पाटील, शरद पाटील, जैन इरिगेशनचे सहकारी के. बी. पाटील, डी. एम. बऱ्हाटे, मोहन चौधरी उपस्थित होते.

आरंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. गजानन ठिबक सिंचन फर्मचे संचालक पी. के. पाटील यांनी केळी पीक परिसंवाद आयोजनाबाबतचा उद्देश प्रास्ताविकात सांगितला. जळगाव विभागाचे विभागीय व्यवस्थापक डी.एम. बऱ्हाटे यांनी ऑटोमेशनबाबत माहिती सांगून आधुनिक सिंचन व्यवस्थापन या विषयावर सोदाहरण मार्गदर्शन केले. ऑटोमेशनमुळे पाणी, खत यांचे अचूकपणे नियोजन करता येते. काम सहजपणे चालविता येते.  मोबाईल किंवा संगणकावर प्रोग्राम केलेला असल्याने मानव विरहीत काम होते त्यामुळे मजुरी खर्चात बचत होते. ऑटोमेशनचे अनेक फायदे मार्गदर्शनपर सुसंवादातून सांगितले.
केळी लागवडीपासून तर केळी काढणीपूर्व व काढणी पश्चात सर्व टप्प्यांबाबत त्यांनी तांत्रिक माहिती दिली. खते, विद्राव्य खते, केळी पिकाच्या वाढीसोबत द्यावयाच्या पाण्याच्या पाळ्या याबाबत प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. केळी पिकावर येणारे रोग त्यासाठी लागणाऱ्या औषधींच्या मात्रा, घ्यावयाची काळजी याबाबत देखील त्यांनी सांगितले. जगाच्या तुलनेत भारतातील केळी उत्पादनाची तुलना देखील करून दाखविली.  काढणीचे तंत्र, पॅकेजिंग आणि निर्यातक्षम केळी याबाबत देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या मनातील शंकांचे समाधान केले. यावर्षी 56 हजार टिश्युकल्चर केळी रोपे खरेदी करणारे नेरी येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र रामदास पाटील यांचा प्रातिनिधीक सत्कार जैन इरिगेशनच्यावतीने डी.एम. बऱ्हाटे व के.बी. पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
तालुका कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले.  केळी पिकासाठी ठिबक सिंचनाचा पुरस्कार शासनाने केला आहे. ‘केळी तिथे नळी’ यासह गट शेती, यांत्रिकीकरण, फळबाग, सामुहीक गोठा व व्यवस्थापन या विविध योजनांबाबत माहिती  दिली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पाटील यांनी केले.  पंचक्रोशीतील 200 हून अधिक केळी उत्पादक शेतकरी या परिसंवादास उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ख्रिसमस कार्निव्हल अंतर्गत इनरव्हील क्‍लबतर्फे ‘हेल्थ अ‍ॅण्ड ब्युटी केअर’वर मार्गदर्शन

Next Post

विध्यार्थ्यानो, रुचणाऱ्या आणि पेलणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड करा : प्रा. राहुल त्रिवेदी

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
विध्यार्थ्यानो, रुचणाऱ्या आणि पेलणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड करा : प्रा. राहुल त्रिवेदी

विध्यार्थ्यानो, रुचणाऱ्या आणि पेलणाऱ्या अभ्यासक्रमाची निवड करा : प्रा. राहुल त्रिवेदी

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us