- भाजपच्या सर्व्हेत पिछाडीवर असलेल्या जावळे यांच्या जागी शरद महाजन यांचा विचार होण्याची शक्यता.
जळगाव – (प्रवीण सपकाळे) मधुकर साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांना भाजपात आणण्यासाठी आ. हरिभाऊ जावळे आग्रही असून यासाठी गुप्त बैठकांसह इतरही हातखंडे वापरून शरद महाजनांच्या भाजप प्रवेशासाठी प्रयत्न होत आहे. मात्र आ.जावळे यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस च्या उमेदवारावर कुरघोडी करण्याच्या नादात आ.जावळे यांच्यावरच “डाव” उलटा होऊ शकतो असे चिन्ह दिसत आहे.
राज्यासह रावेर विधानसभा मतदार संघात
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने सर्व्हे केला आहे. स्थानिक राजकारण, जनसंपर्काचा अभाव, सरकारच्या कामांची अंमलबजावणी व्यवस्थित पद्धतीने न करणाऱ्या आणि अशा विविध निकषांवर 15 आमदारांचं तिकीट भाजप कापणार असल्याची माहिती आहे. या सर्व्हेत आमदार जावळे मतदार संघात पिछाडीवर असल्याचे समजते. यामुळे रावेर मतदार संघात पक्षाकडून उमेदवारीबाबत अनेक पर्यायी नावांचा विचार होता. त्यात भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष अनिल चौधरी, उद्योजक श्रीराम पाटील यांचा समावेश होता. मात्र मसाका चे चेअरमन शरद महाजन हे भाजपात प्रवेश करत असल्याने जातीय समीकरणे लक्षात घेता ते योग्य उमेदवार ठरू शकतात असा कयास भाजपाच्या वरिष्ठ वर्तुळात होतोय. यासंबंधीचा अहवाल मुंबईत गेल्याची चर्चा आहे.
जर पक्षाने शरद महाजन यांना भाजपा मध्ये प्रवेश देऊन उमेदवारी दिली तर शरद महाजन यांना भाजपात आणण्याचा “डाव” खेळनाऱ्या विद्यमान आमदार यांचेच तिकीट कापले जाऊन “डाव” उलटा होऊ शकतो अशी जोरदार चर्चा रावेर मतदार संघात सुरु आहे
लोकसभा निवडणुकीला भाजपने विद्यमान ८ खासदारांचं तिकीट कापलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर विधानसभेलाही भाजप 15 आमदारांचं तिकीट कापणार असल्याची माहिती कळते आहे.भाजपच्या या धक्कातंत्रामुळे विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरच भाजप आमदारांची धाकधूक वाढली आहे. या 15 आमदारांमध्ये कुणाचा नंबर लागतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.