Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपला विश्वास हीच माझी ताकद आहे – मंत्री गुलाबराव पाटील

१७ कोटी निधीतून जळगाव तालुक्यातील १८ किलोमीटर रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

najarkaid live by najarkaid live
January 13, 2025
in जळगाव
0
आपला विश्वास हीच माझी ताकद आहे – मंत्री गुलाबराव पाटील
ADVERTISEMENT
Spread the love

वावडदा/जळगाव : – मंत्री पाटील यांनी जळगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगिक वाढ, आणि आरोग्य सेवांच्या विस्तारावर भर देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि नगरपालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहणे गरजेचे आहे. तुमच्या मेहनतीमुळेच मी आज ६०हजार मताधिक्याने निवडून आलो आहे. कार्यकर्त्यांची श्रीमंती हेच माझे खरे बळ आहे. “रस्ते, पाणीपुरवठा, आणि मूलभूत सुविधा ही विकासाची खरी ओळख आहे. गाव विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी कार्यकर्त्यांनी नम्रतेने व प्रामाणिकपणे काम करावे. तुमच्या पाठीशी हा भाऊ नेहमीच भक्कमपणे उभा आहे, आपल्या सर्वांच्या प्रेमाने आणि विश्वासाने मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली असून, यापुढेही ती विश्वासार्हता कायम ठेवण्याचा माझा निर्धार आहे,”आपला विश्वास हीच माझी ताकद” असल्याचे प्रतिपादन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले ते वावडदा येथे नागरी सत्कार समारंभात बोलत होते.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतर्गत जळगाव तालुक्यातील ४ रस्त्यांच्या १८ कि. मी. डांबरीकरण , काँक्रिटीकरण व लगतच्या संरक्षण भिंत कामासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने १७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या रस्त्यांचे भूमिपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या ४ रस्त्यामध्ये एकूण ४३ मोऱ्यांचे बांधकाम , २ किमी ६०० मीटर कॉन्क्रीटीकरणाचा समावेश आहे.

विरोधकांवर निशाणा
विरोधक केवळ नाटकीपणावर चालले आहेत.. मात्र, आपल्या विश्वासाच्या जोरावरच आपण विकास साधत आहे आणि यापुढेही तो साधत राहीन, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. हा नागरी सत्कार माझ्यासाठी सन्मान आहेच, पण तो अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. मी सदैव जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे, असे भावनिक उद्गार काढत त्यांनी जनतेच्या विश्वासाचा पुनरुच्चार केला. उपस्थित नागरिकांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाला भरभरून दाद दिली.

या रस्त्यांचे झाले भूमीपूजन
जळगाव तालुक्यातील डोमगाव ते बोरनार (३ किमी – ३.९७ कोटी), जवखेडा ते सुभाषवाडी (३ किमी – ४.१७ कोटी), कुसुंबा ते धानवड ते तांडा (८ किमी – ५.८१ कोटी), आणि रामदेववाडी ते कुऱ्हाडदे (४ किमी – ३.८६ कोटी) या एकूण १८ किमी लांबीच्या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी १८ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्ते प्रकल्पांचा शुभारंभ कुसुंबा, धानवड, जवखेडा, डोमगाव, रामदेववाडी आणि वावडदा येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून व श्रीफळ वाहून करण्यात आला.

मंत्री पाटील यांचा भव्य नागरी सत्कार !
यावेळी ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढून फटाक्यांची आतषबाजीत मंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल, श्रीफळ, आणि गुलाबाचा हार घालून म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटातील सरपंच, पदाधिकारी व लोकप्रतीनिधी यांनी भव्य नागरी सत्कार केला. तसेच मंत्री गुलाबभाऊंच्या विकासनिष्ठ भूमिकेचे कौतुक ग्रामस्थांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुध संघ संचालक रमेश आप्पा पाटील यांनी केले, तर व सूत्रसंचालन संदीप सुरळकर यांनी केले तर आभार उपजिल्हा प्रमुख रवी कापडणे यांनी मानले.

या सत्कार मेळाव्याला जिल्हाप्रमुख निलेश पाटील, जि. प. सदस्य पवन सोनवणे, गोपाल चौधरी, भाजपाचे चंद्रशेखर पाटील, उपजिल्हाप्रमुख रवी कापडणे, अनिल भोळे, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, दूध संघाचे रमेश आप्पा पाटील, माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, मु.मं. ग्रा. सडक योजनेचे उप अभियंता जितेंद्र सोनवणे, विरेंद्र पाटील, कंत्राटदार वीरेंद्र पाटील, डॉ. कमलाकर पाटील. अर्जुन पाटील. समाधान चिंचो.रे नगरसेवक गणेश सोनवणे. मनोज चौधरी. श्याम कोगटा, रोहित कोगटा, साहेबराव वराडे, शीतल चिंचोरे, सौ चिमणकर मॅडम, संदीप सुरळक र विकास धनगर धोंडू जगताप, पि.के. पाटील, चेतन बऱ्हाटे , रा. काँ. चे तालुका अध्यक्ष भूषण पवार, जितू पाटील, देविदास कोळी, जिल्हा परिषद गटातील सर्व सरपंच, सोसायटी चेअरमन, पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य महायुतीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोऱ्यात 19 जानेवारी रोजी विधी सेवा महाशिबिर

Next Post

जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाहय साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

Related Posts

Palaskheda Beer Shop Raid: भडगाव पोलिसांची धाड, 28 हजारांची बेकायदेशीर दारू जप्त

Palaskheda Beer Shop Raid: भडगाव पोलिसांची धाड, 28 हजारांची बेकायदेशीर दारू जप्त

July 30, 2025
Anubhuti School Nashik Award:  प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

Anubhuti School Nashik Award: प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

July 29, 2025
जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन - अतुल जैन यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

July 29, 2025
फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

July 29, 2025
Accident jalgaon news: देव दर्शनासाठी जाणाऱ्या दोन मित्रांचा दुचाकी-जीप अपघातात मृत्यू

Accident jalgaon news: देव दर्शनासाठी जाणाऱ्या दोन मित्रांचा दुचाकी-जीप अपघातात मृत्यू

July 29, 2025
Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

Rave Party Pune: रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर अटकेत, रोहिणी खडसे यांची २४ तासानंतर प्रतिक्रिया

July 28, 2025
Next Post
जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाहय साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाहय साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

ताज्या बातम्या

Child Kidnapping in Pune: चिमुरडीचे अपहरण, भीक मागायला लावणारी टोळीचा पर्दाफाश!

Child Kidnapping in Pune: चिमुरडीचे अपहरण, भीक मागायला लावणारी टोळीचा पर्दाफाश!

July 30, 2025
Palaskheda Beer Shop Raid: भडगाव पोलिसांची धाड, 28 हजारांची बेकायदेशीर दारू जप्त

Palaskheda Beer Shop Raid: भडगाव पोलिसांची धाड, 28 हजारांची बेकायदेशीर दारू जप्त

July 30, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

today Rashi bhavishya: आजचे राशीभविष्य 30 जुलै 2025 – जाणून घ्या तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस

July 30, 2025
Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील 'तो' प्लॅट तीन वर्षासाठी सील!

Budhwar Peth: पुणे बुधवार पेठ; कुंटणखान्यातील ‘तो’ प्लॅट तीन वर्षासाठी सील!

July 29, 2025
Anubhuti School Nashik Award:  प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

Anubhuti School Nashik Award: प्रीतिसुधाजी शिक्षण फंड नाशिकतर्फे अनुभूती स्कूलला कौशल्य पुरस्कार

July 29, 2025
जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन - अतुल जैन यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव शहरात यंदा राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

July 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us