Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला माजी खासदार डॉ. उल्हास पाटील कन्यासह भाजपात प्रवेश करणार

najarkaid by najarkaid
January 23, 2024
in जळगाव
0
मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला माजी खासदार डॉ. उल्हास पाटील कन्यासह भाजपात प्रवेश करणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या या भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणारं अशा चर्चा सुरु होत्या अखेर प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून उद्या दिनांक २४ रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीष महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी खासदार डॉ. उल्हास पाटील,पत्नी डॉ. वर्षा पाटील व त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील हे प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान भाजपा प्रवेशापूर्वीच काँग्रेसकडून डॉ उल्हास पाटील यांना निलंबित करण्यात आलेल्या या कारवाईमुळे जळगावच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

डॉ. केतकी पाटील मोदींच्या कार्याने प्रभावित…

कन्या डॉ. केतकी पाटील ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रभावित झाली असून मोदींनी जगात देशाचा नावलौकिक केला आहे,त्यांची कार्यपद्धती बघून तिने भारतीय जनता पार्टी मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. तो तिचा अधिकार आहे. आजपर्यंत ती कोणत्याच पक्षाची सदस्य नसल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितलं.

रावेर लोकसभेची उमेदवारी मिळणार?

आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असतांना जळगाव जिल्ह्यातील एक मोठा नेता भजपात प्रवेश करत असल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. रावेर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी प्रमुख दावेदार असलेले माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आपल्या कन्या डॉ. केतकी पाटील यांच्यासह भाजपा पक्षात प्रवेश करत आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाकडून डॉ. केतकी पाटील या रावेर लोकसभा निवडणूक लढतील असं चित्र दिसत होतं त्या पार्श्वभूमीवर डॉ. केतकी पाटील यांनी रावेर लोकसभा मतदार संघात संपर्क देखील सुरु केला होता. दरम्यान भाजपा प्रवेश होतं असल्याने त्यांना आगामी रावेर लोकसभा उमेदवारीच्या बाबत काही शब्द दिला आहे का याबाबतही राजकीय चर्चा होतांना दिसत आहे. जर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी डॉ. उल्हास पाटील यांना किंवा त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांना उमेदवारी दिल्यास विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता नाकारता येतं नाही.

काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही

आता काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही दिसत असल्याचा आरोप डॉ. उल्हास पाटील यांनी केला असून याचमुळे काँग्रेस रसातळाला जात आहे  असं उल्हास पाटील म्हणाले. कुठलीही विचारणा किंवा नोटीस न देता कारवाई केल्याबद्दल उल्हास पाटील यांनी नाराजी व्यक्त केली, यामुळे इतकं काम करून सुद्धा असं निलंबन झाल्याने मी व्यथित झाल्याचे म्हटले. कुठलाही विचार न करता थेट कारवाई केल्यामुळे आता त्यांना विचारायचं काय?”, असा प्रश्न उल्हास पाटील यांनी उपस्थित केला.

डॉ.उल्हास पाटील भाजपात प्रवेश करणार

यावेळी उल्हास पाटील यांना भाजपात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “कारवाई झाल्यामुळे आता दुसरा काहीतरी विचार करावा लागेल”, असं म्हणत पत्नी वर्षा पाटील यांनासोबत घेऊन कन्या केतकी पाटील सोबत बुधवारी मुंबईत भाजपमध्ये पक्षप्रवेशाचे संकेत दिले. दरम्यान तिघांचाही उद्या भाजपा प्रवेश निश्चित झाला असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जय राम प्रभू श्रीराम… शोभायात्रेत मंत्री गिरीश महाजणांनी कार्यकर्त्यांसह धरला डीजेच्या तालावर ठेका

Next Post

मंत्री गिरीश महाजनांनी केलेलं वक्तव्य खरं ठरणार!

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
मंत्री गिरीश महाजनांनी केलेलं वक्तव्य खरं ठरणार!

मंत्री गिरीश महाजनांनी केलेलं वक्तव्य खरं ठरणार!

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us