Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रमदान करीत “व्हॅलेंटाईन डे” ला विद्यार्थ्यांनी व्यक्त केले शिक्षक, संस्थेप्रती प्रेम

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वाहनतळ झाले सपाट ; पार्किंगसाठी वाढली जागा

najarkaid by najarkaid
February 14, 2021
in जळगाव
0
श्रमदान करीत “व्हॅलेंटाईन डे” ला विद्यार्थ्यांनी व्यक्त केले शिक्षक, संस्थेप्रती प्रेम
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अधिष्ठात्यांसह रविवारी १४ फेब्रुवारी रोजी श्रमदान करीत अनोख्या पध्दतीने “व्हॅलेंटाईन डे” साजरा केला. वाहनतळाची जागा या स्वच्छता अभियानमुळे आता आणखी वाढली असून अधिकाधिक दुचाकी व चारचाकी पार्किंग करण्यासाठी वाहनतळ परिसर मोकळा झाला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना हॉस्पिटल म्हणून घोषित झाले होते. १७ डिसेंबर २०२० पासून कोरोनाव्यतिरिक्त व्याधींवर उपचार करण्यासाठी रुग्णालयातील सुविधा सुरू झाल्या. त्यासह एक फेब्रुवारीपासून वैद्यकीय महाविद्यालय देखील सुरू झाले.

रुग्णालय व महाविद्यालयात गेट क्रमांक २ मधून वाहनांना प्रवेश दिला जातो. या वाहनतळामध्ये रुग्णालय व महाविद्यालयातील गजबज आता वाढली असून दुचाकी पार्किंगसाठी जागा उरत नाही. रविवारी १४ फेब्रुवारी रोजी प्रेमदिनाच्या दिवशी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत वाहनतळाच्या जागेवर सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत श्रमदान करून वाहनतळ सपाटीकरण मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. विजय गायकवाड यांच्यासह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. श्रमदानामध्ये लहान मोठे दगड, गोटे, विविध कचरा यासह उंच व सखोल झालेली जमीन एकसारखी करणे अशा पद्धतीने काम करण्यात आले. त्याचबरोबर पूर्वीचे प्रसाधनगृहांचे राहिलेले अवशेष देखील यावेळी जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले. त्याचबरोबर वाहनतळ पार्किंगची जागा स्वच्छ झाल्यामुळे आता दुचाकी पार्किंगची जागा वाढली आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले की, स्वच्छता केल्यामुळे आरोग्य चांगले राहते. तसेच संघटितपणे काम केल्यानंतर संघभावना वाढीस लागते. एकत्रित श्रम केल्याने वेळ कमी लागून अपेक्षित ध्येय लवकर साधता येते. स्वच्छता, संस्था आणि शिक्षकांप्रति आदर व्यक्त झाला. आजचा श्रमदानाचा अनुभव अविस्मरणीय होता, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी अधिष्ठाता डॉ रामानंद यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तीने श्रमदान केले. यामुळे वाहनतळाचा परिसर बऱ्याच प्रमाणात मोठा झाला असून आता रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांसाठी वाहन पार्किंग करायला मोठी जागा मोकळी झाली आहे. मी स्वतः देखील श्रमदानामध्ये सहभाग घेतला, असेही डॉ.रामानंद म्हणाले.

श्रमदानासाठी सुमारे १८० मुला-मुलींनी उस्फुर्त सहभाग घेतला. यावेळी स्वच्छता निरीक्षक अनिल बागलाणे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी मंगेश बोरसे, ज्ञानेश्वर डहाके, मयुर पाटील, जितेंद्र करोसिया, अजय जाधव, प्रकाश पाटील, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी, विद्यार्थी प्रतिनिधी सुजय पट्टणशेट्टी, सर्व्हेश काबरा यांच्यासह सफाई कामगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पत्रकार दिलीप शिरूडे यांना पितृ शोक

Next Post

कुरंगी ग्रामपंचायत सरपंचपदी मनिषा पाटील तर उपसरपंचपदी शालिग्राम पाटील

Related Posts

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post
कुरंगी ग्रामपंचायत सरपंचपदी मनिषा पाटील तर उपसरपंचपदी शालिग्राम पाटील

कुरंगी ग्रामपंचायत सरपंचपदी मनिषा पाटील तर उपसरपंचपदी शालिग्राम पाटील

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us