Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुक्ताईनगर तालुक्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

najarkaid by najarkaid
June 2, 2021
in Uncategorized
0
मुक्ताईनगर तालुक्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर-प्रतिनिधी:-(विनोद कोळी)- मुक्ताईनगर मतदारसंघातील (रावेर विभाग)तालुक्यातील निंभोरासिम,विटवा,निंबोल ऐनपूर,सुलवाडी, कोळदा,धामोडी,वाघाडी,रेभोटा, शिंगाडी, कांडवेल या भागात गुरुवारी दिनांक 27 मे रोजी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रावेर तालुक्यातील 12 पेक्षा जास्त गावांना जोरदार तडाखा दिला.या वादळामुळे अनेक गावांमध्ये घरावरील पत्रे उडाली.ठिकठिकाणी झाडे तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.कापणीला आलेल्या केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले.त्यासंदर्भात पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षाताई खडसे यांनी केळीच्या नुकसानग्रस्त शेती शिवारात भेट दिली त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आमच्या काळात आम्ही नुकसान ग्रस्त भागात सरसकट 50 टक्के अर्थसाह्य ,मदत देत होतो परंतु आताच्या महा विकासआघाडी सरकारने ते ही बंद केले आहे. पिक विमा योजने संदर्भात कंपन्या आजही त्याच आहेत फक्त राज्य सरकारने त्यांच्या निकषांमध्ये बदल केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

केंद्रशासन त्यासाठी पैसा पुरवीत आहे परंतु राज्य शासनाचे काम आहे केळी पीक विमा योजनेचे निकष ठरवणे, टेंडर काढणे, राज्य सरकारने टेंडर उशिरा काढल्यामुळे लोकांनी उशिरा पैसे भरले त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी येत आहेत.असे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी मांडले.पत्रकार यांनी वार्तालाप करतांना देवेंद्र फडवणीस यांना मागील एक वर्षापूर्वी त्यांनी मेगा रिचार्ज प्रकल्प याबद्दल आश्वासन दिले होते त्यांची आठवण त्यांना करून दिली त्यावर त्यांनी सांगितले मेगा रिचार्ज प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असून त्याचा डी पी आर तयार होत आहे येत्या दोन ते तीन महिन्यात हा डीपीआर तयार होईल आणि लवकरच मेगा रिचार्ज प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येईल.

माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांची आठवण याठिकाणी देवेंद्र फडवणीस यांना झाली 2019 मध्ये जेव्हा याच पद्धतीने चक्रीवादळ आले होते तेव्हा आम्ही हरिभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती त्या समितीने जे काही निकष दिले होते त्यात आम्ही पिक विमा योजना घेतलेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत करत होतो व ज्यांनी पिक विमा योजना घेतला नाही त्यांना सुद्धा आम्ही आर्थिक सहाय्य करत होतो आताच्या सरकारने पीक विमा योजनेच्या निकषांमध्ये बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत देणार? यावर देवेंद्र फडवणीस त्यांनी सांगितले आमच्या काळात आम्ही साडेतीन हजार रुपये हेक्टरी मदत केलेली होती आता संपूर्ण पाहणी केल्यानंतर ठरवले जाईल व सरकारकडे आम्ही जास्तीत जास्त हेक्टरी मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असे सांगितले.धामोडी,कोळदा,सुलवाडी येथे नुकसान ग्रस्त घरांचे पाहणी करतांना ज्यांच्या घराचे नुकसान झाले होते त्या महिलांनी रडत-रडत आपली कैफियत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली एक वृद्ध महिलेने सांगितले आतापर्यंत अनेक लोक येऊन गेले म्हणजेच अनेक दौरे झाले ( मागील चार ते पाच दिवसात) परंतु कोणी काहीच मदत केली नाही.फक्त सर्वांनी आश्वासने दिली.अशी व्यथा त्यांनी मांडली.

सर्व पाहणी दौरा आटोपल्यानंतर तांदलवाडी येथे देवेंद्र फडवणीस यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी शेतकऱ्यांनी विमा कंपनी बाबत तक्रार केलेली आहेत तिथे अजूनही नुकसानग्रस्त भागात पाहणीसाठी आलेच नाहीत त्यामुळे आपण विमा कंपन्यांसोबत बोलणार आहोत नुकसान 100 टक्के आहे.परंतु विमा कंपन्या हे 60 टक्‍के दाखवत आहे महसूल यंत्रणेने जर 100 टक्के नुकसान दाखवले असेल त्यानुसार पंचनामे झाले पाहिजे किमान ऐंशी टक्के तरी मदत ही शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे. सरकार हेक्टरी रु.6000 ते रु. 8000 मदत करणार आहे.परंतु एवढ्यावर शेतकऱ्यांचे भागणार नाही नुकसान खूप मोठे आहे.त्यासाठी आम्ही शासनाकडे जास्तीत जास्त मदतीसाठी पाठपुरावा करणार आहोत असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी त्यांच्यासोबत जामनेरचे आ. गिरीश महाजन, रावेरच्या खा. रक्षाताई खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना ताई पाटील, जळगावचे खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण,आमदार संजय सावकारे मा.आ.स्मिताताई वाघ, मा.वि.सदस्य चंदु पटेल, जि.प.सदस्य नंदू महाजन,माजी कृषी उत्पन्न सभापती श्रीकांत पाटील,मोरगाव चे प्रल्हाद पाटील पंचायत समिती सभापती कविताताई कोळी, तहसीलदार उषाताई देवगुणे,बीडीओ-दिपाली कोतवाल , कृषि अधिकारी, तलाठी,ग्रामसेवक, तसेच रावेर तालुका भाजपा अध्यक्ष राजेंद्र लासूरकर, महेंद्र पाटील ,हरलाल कोळी,सदिप सावळे,रत्नाकर महाजन, शुभम पाटील, अमोल महाजन, अतुल पाटील यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशद्रोही लिखाण करणारे गिरीष कुबेर लिखित रीनेइसन्स स्टेट या वादग्रस्त पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानची मागणी

Next Post

फडणवीसांनंतर एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला ; राजकीय चर्चेला उधाण

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
फडणवीसांनंतर एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला ; राजकीय चर्चेला उधाण

फडणवीसांनंतर एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला ; राजकीय चर्चेला उधाण

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us