Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निलंबाना नंतर काय म्हटले आ. गिरीश महाजन वाचा….

najarkaid by najarkaid
July 5, 2021
in Uncategorized
0
कोरोनातून बरं होताचं पहिल्याच दिवशी गिरीश महाजन पोहचले जळगाव येथील कोविड रुग्णालयात… यावेळी नेमकं काय  म्हणाले आ. महाजन वाचा…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई (विशेष प्रतिनिधी)- राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पावसाळी अधिवेशन गुंडाळण्याची घाई झाली असून यात ओबीसी आरक्षणाला पध्दतशीरपणे खो देण्यासाठी आणि भाजपचे सभागृहातील संख्याबळ कमी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने आमदार निलंबनाचा कुटील डाव रचल्याची घणाघाती टीका माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे.

आज राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबीत करण्यात आले. यात माजी मंत्री तथा जामनेरचे आमदार गिरीशभाऊ महाजन यांचा देखील समावेश आहे. निलंबनावर त्यांनी अतिशय जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. गिरीशभाऊ म्हणाले की, राज्यातील ओबीसी समुदायाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले असले तरी महाविकास आघाडी सरकार ढिम्म बसून आहे. त्यांना ओबीसींना हक्क द्यायचे नाहीत. यामुळे आज कथितरित्या ओबीसी हिताचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात ओबीसींच्या आवाजाची मुस्कटदाबी करण्याचे कारस्थान सरकारने रचले आहे. यामुळे सभागृहात चर्चेची तयारी दाखविणार्‍या भाजपच्या बारा आमदारांना निलंबीत करण्यात आले आहे.

वास्तविक पाहता भाजपच्या आमदारांनी नव्हे तर महाविकास आघाडीच्या आमदाराने असभ्य वर्तन केल्याचे सर्वांनी पाहिले असून याचे सीसीटिव्ही फुटेज सरकारने तपासण्याची गरज आहे. मात्र आपल्या आमदारावर कारवाई करायचे सोडून भाजपच्या आमदारांचे निलंबन करण्याचा नालायकपणा या सरकारने केला आहे. याचाच अर्थ या सरकारला ओबीसींच्या हिताशी काही एक देणेघेणे नाही. तसेच भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमुळे महाविकास आघाडी सरकार बदनाम झाले असून सभागृहात आपली कोंडी होऊ नये म्हणून भाजपचे १२ आमदार निलंबीत करून विरोधी पक्षाचे संख्याबळ कमी करण्याचे कारस्थान रचल्याचे यातून दिसून आले आहे.

वास्तविक पाहता या अधिवेशनाच जनहिताच्या अनेक मुद्यांवरून चर्चा अपेक्षित होती. यात मराठा व ओबीसी आरक्षण, विद्यार्थ्यांचे विविध प्रश्‍न, पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांची झालेली हानी, कोविडमुळे विस्कळीत झालेली विकासकामे आदींसह अनेक मुद्यांचा समावेश होता. तथापि, सरकारला यावर चर्चा होऊ द्यायची नव्हती. कारण गेल्या काही महिन्यांमधील सरकारचे प्रताप यातून समोर आले असते. यात वाझे प्रकरण, दरमहा १०० कोटींच्या वसुलीचे प्रकरण, अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईक आदींसह इतर नेत्यांच्या भ्रष्टाचारातील वेगवेगळे कंगोरे अजून जगासमोर आले असते*. यामुळे सरकारने नाचक्की टाळण्यासाठी आमदारांना निलंबीत करण्याचा कट रचल्याचा आरोप आ. गिरीशभाऊ महाजन यांनी केला. ते पुढे म्हणाले की, आमदार भास्कर जाधव यांनीच भाजपच्या सदस्यांना शिवीगाळ करून धमकावले असतांना आमच्यावर केलेली कारवाई म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होत !

आ. गिरीशभाऊ महाजन पुढे म्हणाले की, सरकारने आमचे निलंबन केले असले तरी आमचा लढा कायम सुरू राहणार आहे. आम्ही कुणाच्या दबावाला भिक घालणार नाही. सभागृह नसले तरी आमच्यासाठी प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि थेट जनतेच्या दरबाराचे पर्याय आहेच. आम्ही जनेतेत जाऊन महाभकास आघाडी सरकारचे लक्तरे वेशीवर टांगू, आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही आ. गिरीशभाऊ महाजन यांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजीमंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह बारा आमदारांवर निलंबणाची कारवाई

Next Post

सफाई कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयात स्वतंत्र ‘सफाई कर्मचारी आयोग कक्ष’ स्थापन

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
सफाई कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयात स्वतंत्र ‘सफाई कर्मचारी आयोग कक्ष’ स्थापन

सफाई कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयात स्वतंत्र ‘सफाई कर्मचारी आयोग कक्ष’ स्थापन

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us