Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन इरिगेशन कंपनीची वाटचाल शाश्वत – अनिल जैन

najarkaid live by najarkaid live
September 30, 2019
in राज्य
0
जैन इरिगेशन कंपनीची वाटचाल शाश्वत – अनिल जैन
ADVERTISEMENT

Spread the love

  • 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

जळगाव दि.30 (प्रतिनिधी) – जैन इरिगेशन कंपनीचे संस्थापक भवरलालजी जैन यांचे स्वप्न होते की, जैन इरिगेशन ही कंपनी शाश्वत रहावी आणि या शेती उद्योगाद्वारे शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत याअनुषंगाने ही कंपनी कार्यरत आहे. पुढील 18 ते 20 महिन्यांमध्ये सुमारे 2 हजार कोटी कर्ज कमी करून प्रतिकुल आर्थिक परिस्थीतीवर मात करण्याचे नियोजन असल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी भागधारकांसमोर सांगितले.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या 32 सर्वसाधारण सभेत भागधारकांशी सुसंवाद साधताना कंपनीचे उपाध्यक्ष तथाव्यवस्थापकीय संचालक अनिल जैन. व्यासपीठावर डावीकडून सचिव अवधूत घोडगावकर, ऑडीटर सोमनाथ साखरदंडे, संचालक वसंत वर्टी, डॉ.डी. आर. मेहता,घनश्याम दास, अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, चिफ फायनान्स ऑफिसर अतुल जैन, राधीका परेरा, आर. स्वामीनाथन, डॉ. एच. पी. सिंग, संघपती दलिचंदजी जैन, गिरधारीलाल  ओसवाल, जैन फार्मफ्रेश फूड्सचे संचालक अथांग जैन,कार्यकारी संचालक सुनील देशपांडे आदि.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अशोक जैन बोलताना म्हणाले की, कंपनीचा जगामध्ये अधिकाधिक नावलौकिक व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.‘जेव्हा निर्णायक दिवस येतात तेव्हा स्वार्थापेक्षा परमार्थाला अधिक महत्त्व द्यायचे असते आणि कुटुंबासह नेहमीच कंपनीला प्राधान्य द्या’ या भवरलालजी जैन यांच्या आदर्शमुल्यांच्या मजबुत पायावर उभी आहे.

यावेळी उपस्थितांशी अनिल जैन यांनी सुसंवाद साधला. याप्रसंगी व्यासपीठावर सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, चिफ फायनान्स ऑफिसर अतुल जैन, संचालक मंडळातील आर. स्वामीनाथन, डॉ. एच. पी. सिंग, राधीका परेरा, संचालक घनश्याम दास,डॉ. डी. आर. मेहता, सचिव अवधूत घोडगावकर, संघपती दलिचंदजी जैन, गिरधारीलाल ओसवाल, जैन फार्मफ्रेश फूड्सचे संचालक अथांग जैन, कार्यकारी संचालक सुनील देशपांडे उपस्थित होते. या सभेत सर्व ठराव मंजूर करण्यात आलेत तर लाभांशाचा ठराव स्वतंत्रपणे मंजूर करण्यात येणार आहे.

कंपनीच्या एकूण परिस्थितीबद्दल भूमिका मांडताना अनिल जैन म्हणाले की, गत आर्थिकवर्ष आपल्यासाठी खूप चांगले होते. भारत व भारताबाहेरच्या संलग्न कंपन्यांनी चांगला व्यवसाय केला. चालू आर्थिक वर्षात अनेक आव्हाने आलीत. गेल्या महिन्यांपासून काही प्रकल्पांची रक्कम येणे बाकी आहे, तसेच  बँकांच्या बदललेल्या धोरणांमुळे कंपनीला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू असुन लवकरच थकीत रकमेची वसुली करून कंपनी पुर्वपदावर येईल असा आशावाद व्यक्त केला. कंपनीच्या भविष्यातील वाटचालीसाठी आणि सक्षमीकरणासाठी जागतिक व भारताच्या पातळीवर एक वित्तीय साहाय्य करणारी संस्था नियुक्त करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून लवकरच गुंतवणूकदार मिळेल असा विश्वास आहे.

यावेळी संचालकांच्या वतीने ज्येष्ठ संचालक डॉ. डी. आर. मेहता यांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ‘जैन इरिगेशन कृषीक्षेत्राला अत्याधुनिक तंत्रासह वेगळ्या उंचीवर नेणारी कंपनी असून कंपनीचे भविष्य उज्ज्वल आहे.’असे त्यांनी सांगितले.

‘भूमिपुत्राने भूमिपुत्रांसाठी या कंपनीची स्थापना केली असल्याने तिची वाटचाल शाश्वत आहे. कंपनी हा अखंड यज्ञ व तपस्या आहे. त्याग आणि समर्पण भावनेने काम करून धेयापासून विचलीत न होता संस्थापक भवरलालजी जैन यांचे ही कंपनी शंभर वर्षांहून अधिक वर्ष कार्यरत राहावी हे स्वप्न होते. आणि या स्वप्नपुर्तिसाठी आम्ही सारे कटिबद्ध आहोत.’

संचालक वसंत वर्टी यांचा सत्कार

गत 14 वर्षापासून कंपनीत कार्यरत असलेले संचालक वसंत वर्टी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक डी. आर. मेहता यांच्याहस्ते शाल, श्रीफल, गांधी पुतळा देऊन करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना वसंत वर्टी म्हणाले की, एक वेगळी आणि शाश्वत कंपनी म्हणून मी जैन इरिगेशनकडे नेहमीच पाहतो. माझ्या संचालकपदाचा काळ माझ्यासाठी खूप गौरवाचा होता.

बॅकड्रॉपवर प्रेरणादायी विचार

कार्पोरेट क्षेत्रातील घडामोडींमुळे उदासीनतेचे वातावरण सध्या आहे. या वातावरणात भागाधारकांना प्रेरणा देणाऱ्या काव्यपंक्ती ‘काळ्या मेघांनी जेव्हा तुमचे आकाश काळवंटे, कडाडती वीज तुमचे जग दुभंगते,घनगर्जनानी तुमची शांति उध्वस्त होते, लक्षात ठेवा तेव्हाच जलधारांची वृष्टी होते. वृष्टी जी भूमी सुपीक ,हिरवीगार आणि समृद्ध करते ‘सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिरीषदादा चौधरींच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत लोकजनशक्‍ती पार्टीच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

Next Post

माझा आतला आवाज सांगतोय, यावेळी यश मिळेल: राज ठाकरे

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
माझा आतला आवाज सांगतोय, यावेळी यश मिळेल: राज ठाकरे

माझा आतला आवाज सांगतोय, यावेळी यश मिळेल: राज ठाकरे

ताज्या बातम्या

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

March 12, 2026
ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us