Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा प्रशासन आणि रेडक्रॉस संस्थेच्या मदतीने जिल्ह्यात 15 लाख 29 हजार 500 अर्सेनिक अल्बम-30 औषधाच्या बॉटल्सची निर्मिती

najarkaid by najarkaid
July 20, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,  दि. 20 – कोरोनाच्या आपत्तीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांना आधार देण्यासाठी होमीओपॅथी डॉक्टरांशी चर्चा करुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे मार्गदर्शनाखाली कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांचे श्रमदानातून, दानशूर व्यक्तींचे योगदानातून आणि रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने जिल्ह्यातील जवळपास 45 लाख लोकसंख्येस म्हणजेच अंदाजे 11 लाख 50 हजार कुटुंबांना मोफत वाटपासाठी अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधाच्या आतापर्यंत 15 लाख 29 हजार 500 बॉटल्सची निर्मिती पूर्ण झाली असून त्याचे वाटपही सुरु करण्यात आले आहे. अशी माहिती अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव तथा इंन्सिडंट कमांडर प्रतिबंधात्मक उपाययोजना गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झालेल्या जवळपास 75 ते 80 टक्के रुग्णांना अत्यंत सौम्य किंवा कोणतीही लक्षणे दिसत नसून त्यांची प्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे ते सहज या आजारावर मात करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जे विविध उपाय सुचविलेले आहेत. त्यामध्ये अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधाचा समावेश आहे. या औषधाची अचानक मागणी वाढल्यामुळे व पुरवठा कमी प्रमाणात असल्यामुळे औषधाच्या एका बॉटल्सची किंमत 15 रुपयापासून 50 रुपयापर्यत वेगवेगळ्या मेडीकल स्टोअर्समध्ये आकारली जात होती.

याकरीता जिल्हा प्रशासनाच्यावतीने हा निर्णय घेऊन औषधी वाटपाचे नियोजन केले. औषध निर्मितीचे या कालावधीमध्ये सर्व स्वयंसेवकाचे जेवणाचे, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, थर्मल स्क्रिनींग आणि औषध निर्मीतीसाठी लागणारे सर्व साहित्य काटकसरीचे दरामध्ये खरेदी करणे, औषध निर्मितीचे कामकाजाचे व्यवस्थापन करणे हे काम रेडक्रॉस संस्थेचे उपाध्यक्ष श्री. गनी मेमन, श्री. विनोद बियाणी, श्रीमती मकासरे, श्री. सुभाष साखला, श्री. स्वप्नील वाघ आणि त्यांचे सहकारी यांनी केले. जिल्हा प्रशासनामार्फत कामकाजावर देखरेख नायब तहसिलदार श्री. सुनिल समदाने आणि श्री. भालेराव यांनी केले.

उपविभागीय अधिकारी, पाचोरा श्री. राजेंद्र कचरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी स्वयंस्फृर्तपणे पाचोरा येथे औषध निर्मितीमध्ये सहभाग घेवून 1 लाख 90 हजार 500 औषधांचे बॉटल्सची निर्मिती केली.

कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी, कोव्हीड आपत्तीच्या या कालावधीमध्ये देशासाठी धावून जाण्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जाणीवपूर्वक सहभाग घेण्यात आला. एम. जे. कॉलेज, बेंडाळे कॉलेज, नुतन मराठा कॉलेज, बाहेती कॉलेज, शिरीष मधुकरराव चौधरी कॉलेज, सामाजिक शास्त्र विभाग, इकरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला, सागर देवगिर गोसावी हा विद्यार्थी फत्तेपूर-शेंगोळा, ता. जामनेर येथून दररोज 65 कि.मी. प्रवास करुन यायचा. त्याला येवू नको असे सांगूनही तो एकही दिवस गैरहजर राहिला नाही. राष्ट्रीय कार्यामध्ये सहभागी होता आल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांसोबतच जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक, एम.जे. कॉलेज, बेंडाळे कॉलेज, गुळवे विद्यालय, जिल्हा परिषद विद्यानिकेतन, ओरिएन स्कूल, शारदा माध्यमिक विद्यालय, ज.सु. खडके विद्यालय, बी.एड. कॉलेज, बाहेती कॉलेज, महाराणा प्रताप हायस्कूल, आर.आर. हायस्कूल, सेठ ला.ना. हायस्कूल, ए.टी. झांबरे हायस्कूल, शिरीष मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे शिक्षक, केशव स्मृती प्रतिष्ठान, अल्फाईज फाऊंडेशन, जननायक फाऊंडेशन, सिंधी समाजबांधव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, एम.एम. कॉलेज पाचोरा, गोसे हायस्कूल, नावरे विद्यालय, शिंदे प्रशाला, तहसिल कार्यालय, पाचोरा चे कर्मचारी, नेहरु युवा केंद्र जवळपास 1100 स्वयंसेवक वेगवेगळ्या वेळी या राष्ट्रीय कार्यामध्ये सहभागी झाले. आपत्तीच्या वेळी राष्ट्रीय कार्यामध्ये सहभागी झाल्याचा आनंद त्यांचे चेहऱ्यावर दिसून येत होता. सुरक्षिततेचे आणि सोशन डिस्टसिंगचे सर्व नियम पाळून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक आणि शिक्षण विभाग, कृषी विभाग, खते बियाणे, ड्रीप इरिगेशन असोसिएयशन, सिंचन विभागातील अधिकारी/ कर्मचारी, राजपत्रित अधिकारी महासंघ, महसूल कर्मचारी संघटना, ग्रामसेवक संघटना, बाफना ज्वेलर्स आणि इतर दानशूर व्यक्तींनी आर्थीक मदतीमध्ये मोलाचे सहकार्य केले. आपल्या देशाच्या माजी राष्ट्रपती महोदया श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी रुपये 1 लक्ष आर्थीक मदत देवून आम्हाला प्रोत्साहीत केले. खानदेश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. नंदकुमार बेंडाळे यानी एम.जे. कॉलेजचा परिसर सर्व सुविधांसह या कामासाठी उपलब्ध करुन दिला.

निर्मिती करण्यात आलेल्या औषधांचे बॉटल्सची वितरणाची व्यवस्था उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी भारदे आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी पार पाडली. स्वयंसेवकाचे श्रमदानामुळे औषध निर्मितीचा खर्च निम्मा कमी झाला. प्रति बॉटल्स औषध निर्मितीचा खर्च जवळपास 1.50 रुपये प्रतिकुटुंब/ महिना आला. औषध निर्मितीच्या या प्रकल्पामध्ये सहभागी सर्व स्वयंसेवक, दानशूर व्यक्ती, रेड क्रॉस सोसायटी आणि ज्यांनी ज्यांनी या प्रकल्पास मदत केली त्या सर्वांचे गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) तथा अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी आभार मानले आहे.

 पहिल्या टप्प्यातील शिल्लक : 71,938 + दुसऱ्या टप्प्यातील निर्मिती बॉटल्स 11,92,500
 एकूण 12,64,438 बॉटल्स निर्मिती.
 पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 2,65,000 कुटुंबियांना औषधीचे मोफत वाटप.
 दुसऱ्या टप्प्यामध्ये मागणीप्रमाणे 952720 कुटुंबियांना औषधीचे मोफत वाटप.
 एकूण 1217720 कुटुंबांना दोन टप्प्यामध्ये आर्सेनिक अल्बम -30 या औषधीचे मोफत वितरण करण्यात आले.
 जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मागणीप्रमाणे आर्सेनिक अल्बम -30 या औषधीचे मोफत वितरण उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी नगर परिषद यांचेमार्फत करण्यात आले आहे.
 गावपातळीवर औषधाचे घरोघरी जावून अंगणवाडी सेविका / आशावर्कर यांचे मार्फत करण्यात आले आहे.

• तालुका निहाय औषध वाटपाचा तपशिल :
अ.क्र. तालुक्याचे नाव ग्रामीण क्षेत्र नागरी क्षेत्र एकूण
1 जळगाव 47800 143833 191733
2 पारोळा 35000 8500 43500
3 धरणगांव 35000 15000 50000
4 एरंडोल 28350 7850 46200
5 भुसावळ 30012 37000 67012
6 वरणगांव 0 8000 8000
7 रावेर 65000 9000 74000
8 फैजपूर 0 5000 5000
9 यावल 47775 5100 52875
10 चाळीसगाव 42000 20100 62100
11 चोपडा 58000 17000 75000
12 मुक्ताईनगर 35000 5000 40000
13 बोदवड 18100 0 18100
14 अमळनेर 35000 22000 57000
15 जामनेर 44300 10000 54300
16 पाचोरा 62000 15000 77000
17 भडगाव 30000 11000 41000
एकूण 613337 339383 952720

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोविड-19 च्या परिस्थितीमध्ये मृतदेह हाताळण्याबाबत मार्गदर्शक सुचना जाहिर

Next Post

पाचोरा रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ साधेपणाने

Related Posts

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
पाचोरा रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ साधेपणाने

पाचोरा रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ साधेपणाने

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us