Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्याचे बीड होवू नये – जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्याचे पोलीस अधीक्षकांना पत्र

कार्यालयातून संगणक चोरी प्रकरणी तत्कालीन जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार

najarkaid by najarkaid
March 29, 2025
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्याचे बीड होवू नये – जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्याचे पोलीस अधीक्षकांना पत्र
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव कार्यालयातून सुमारे सव्वालाख किमतीचे दोन संगणक संच तत्कालीन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग इंदलसिंग परदेशी यांच्या सांगण्यावरून सखी वन स्टॉप सेंटर, जळगाव येथील कंत्राटी कर्मचारी शुभम हिरालाल परदेशी पद- सुरक्षा रक्षक याने चोरी केल्या प्रकरणी तक्रार अर्ज   जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी पोलीस अधीक्षक, जळगाव यांना दिले असून चोरी प्रकरणातील आरोपी व त्यांना मदत करणाऱ्यां विरुद्ध गुन्हा नोंदविन्यात यावे असे पत्र दिले असून जळगाव  जिल्ह्याचे बीड होऊ देऊ नका अशी विनंती देखील श्री तडवी यांनी दिलेल्या पत्रात केल्याने खळबळ उडाली.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव या कार्यालयातील All In One PC Lenovo एक संगणक संच शासकीय आशादीप महिला वसतीगृह, जळगाव यांना कार्यालयाच्या वापरासाठी पुरवठा करण्यात आलेला होता. सदरील संगणक संच हा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव या कार्यालयात कामकाजासाठी आवश्यकता असल्याने सदर संगणक संच या कार्यालयात दि.०२.०३.२०२३ रोजी आणलेला होता. तसेच All In One PC Acer ALO या कंपनीचे ०१ संगणक संच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव या कार्यालयातच होता.

आयुक्तालयामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव या कार्यालयासाठी नव्याने ०५ संगणक संच दि.१७.०४.२०२४ रोजी प्राप्त झालेले असल्याने, सदरील संगणक संचावर जडसंग्रह नोंदवहीच्या नोंदीनुसार संगणकावर निर्देशांकन करणेसाठी दि.११.०३.२०२५ रोजी पेंटरला बोलाविले असता, All In One PC Lenovo व All In One PC Acer ALO हे ०२ संगणक कार्यालयात आढळून आले नाही. याबाबत कार्यालयात सर्वत्र ०२ संगणकांचा तपास केला असता, सदरील संगणक संच सापडून आले नाहीत. सदरील दोनही संगणक संच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव या कार्यालयातंर्गत कार्यरत असलेले सखी वन स्टॉप सेंटर, जळगाव येथील कंत्राटी कर्मचारी शुभम हिरालाल परदेशी पद- सुरक्षा रक्षक याचे चूलते श्री. विजयसिंग इंदलसिंग परदेशी हे तत्कालिन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव या पदावर कार्यरत असल्यामुळे शुभम हिरालाल परदेशी याने त्याचे काका विजयसिंग इंदलसिंग परदेशी यांचे सांगण्यावरुन १) All In One PC Lenovo व All In One PC Acer ALO असे ०२ संगणक संच घरी चोरुन घेवून गेलेला आहे.

याबाबत, पोलीस निरिक्षक, जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे सदरील संगणक संच चोरुन नेलेबाबतची फिर्याद देणेसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव हे स्वःता व इतर ०३ कर्मचारी गेले असता, तेथील पोलीस निरिक्षक यांनी गुन्हा दाखल करता येणार नाही असे सांगीतले. सदर कर्मचारी तत्कालिन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, श्री. विजयसिंग इंदलसिंग परदेशी यांचा पुतण्या असुन, शुभम हिरालाल परदेशी या कंत्राटी कर्मचारी याचे भाऊ व वहिणी हे पोलिस खात्यात कार्यरत असल्याने सबंधीत पोलीस निरिक्षक, जिल्हापेठ पोलीस स्टेशन, जळगाव यांनी रफीक रुबाब तडवी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांची संगणक संच चोरुन नेले बाबतची तक्रार दाखल करुन घेतली नाही.

तरी, श्री. विजयसिंग इंदलसिंग परदेशी हे तत्कालिन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव व शुभम हिरालाल परदेशी यांच्या बाबतीत योग्य ती दखल घेवुन संबधितांवर योग्य तो चोरीचा गुन्हा दाखल करावा ही विनंती तसेच चोरांना साथ देणाऱ्या सबंधीत पोलीस निरिक्षक यांचे विरुध्द योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती व जळगाव जिल्ह्याचे बीड होवू नये अशी विनंती रफिक हुरमत रुबाब तडवी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जळगाव यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Next Post

गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आणि इतर महत्त्वाचे वेळा संपूर्ण जाणून घ्या…

Related Posts

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Next Post
गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आणि इतर महत्त्वाचे वेळा संपूर्ण जाणून घ्या…

गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आणि इतर महत्त्वाचे वेळा संपूर्ण जाणून घ्या...

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us