जळगाव,(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ पाहायला मिळत असून राजकीय नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी करत आहेत भाजपातून राष्ट्रवादी पक्षात आलेले महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करून स्वगृही परतणार असल्याचं त्यांनी स्वतः मीडियाला सांगितलं आहे, खडसेंचा भाजपा पक्षप्रवेश येत्या काही दिवसात भजपाच्या केंद्रीय नेतृत्वात होण्याची शक्यता आहे.दरम्यान माजी मंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा राज्यातील भाजप नेत्यांवर आरोप केला आहे.त्यामुळं नाथाभाऊ भाजपात स्वगृही परतल्यावर सुद्धा राज्यातील नेते खडसे यांच्यासोबत जुळवून घेतील का प्रश्न अजूनही अनुउत्तरीत आहे.
आज जळगावात सिंधी समाजातर्फे आयोजित एका कार्यक्रमात माजी मंत्री एकनाथ खडसे उपस्थित होते यावेळी बोलतांना त्यांनी काही लोकांमुळे आपल्याला भाजप सोडावी लागली होती. भाजपशी, मोदीजी यांच्याशी आपला कुठलाही ताणतणाव नव्हता, अशा शब्दांत खडसेंनी राज्यातील भाजप नेत्यांविरोधातली आपली नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे लवकरच खडसेंची भाजपमध्ये घरवापसी होतं असून त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरेंची ‘ती’ चूक अक्षम्य ; गुढी पाडव्याच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांचा ठाकरेंवर निशाणा










