जळगाव,(प्रतिनिधी)- दिवंगत पत्रकार संतोष ढीवरे यांचा मुलगा आयुष (वय १२) याचे अल्पशा आजाराने आज दिनांक २६ रोजी अकरावाजेच्या सुमारास मुंबईत रुग्णालयात उपचार सुरु असतांना दुःखद निधन झाले.

सोमवार दिनांक २७ रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरून अंत्ययात्रा निघेल व मेहरून येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. पत्रकार संतोष ढीवरे यांचे देखील दोन वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते ढीवरे कुटुंब त्या दुःखातून सावरत नाही तो पर्यंत एकुलता एक मुलगा आयुष देखील सोडून गेल्याने ढिवरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पच्छात आई व दोन बहिणी, काका ईश्वर ढिवरे, आजी असा परिवार आहे.










