बोदवड – सध्या कडक उन्हाळा सुरू असुन जळगाव जिल्हयात सूर्यनारायण आग ओकत असल्याने तापमान 45 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचल्याने सर्व जण उष्णतेत होरपळत असताना काल शनिवारला संध्याकाळी मुक्ताईनगर,रावेर, बोदवड तालुक्यात आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने केळीच्या बागा भुईसपाट झाल्या असुन शेती शिवार आणि घरांचे, जनावरांच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

माझी बायको बनून राहिलीस तर दर महिन्याला तुला ५ हजार रूपये देईल ; सासऱ्या विरुद्ध सून पोलिसात
३१ मे शुक्रवार ते २ जून दरम्यान CSMT रेल्वे स्थानकात ३६ तासाचा मेघा ब्लॉक ; ६९ ट्रेन रद्द, संपूर्ण यादी पहा
मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य
आत्महत्या करण्याआधी तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ
नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव
कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ
काकूने लहान बाळाला पाजलं विष ; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आला समोर
आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!
धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध
पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला, पुढं जे झालं ते भयानकच!
१० वीच्या निकालाची तारीख जाहीर, असा पाहता येईल निकाल
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले
आज रविवारला राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील शिरसाळा,चिचखेडा सिम, लहान मनुर,ऐनगाव चिखली येथे नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिकांना धिर दिला देऊन
नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्या संबंधी प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या सोबत चर्चा केली
तसेच आचारसंहिता शिथिल करून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या जळगाव जिल्हयात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला असताना काल अचानक आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने मुक्ताईनगर ,रावेर, बोदवड तालुक्यात शेती शिवार घरे व गोठयांचे मोठे नुकसान झाले आहे.

मार्च महिन्यात झालेले वादळ अवकाळी पाऊस, एप्रिल मे महिन्यातील उष्ण तापमानामुळे केळी बागांची हानी होऊन केळीच्या दरात मोठी घसरण झाल्याने आधीच प्रचंड
नुकसान सोसत असलेल्या शेतकऱ्यांसमोर काल झालेल्या वादळ आणि अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. केळीसारख्या पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले हे पीक क्षणार्धात डोळ्यांसमोर जमिनदोस्त होताना शेतकरी बांधवाना पाहावे लागले यामुळे शेतकरी बांधव हतबल झाले आहेत तसेच अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळे व घरांची पडझड झाल्यामुळे संसारपयोगी साहित्याचे नुकसान होऊन संसार उघड्यावर पडले आहेत
जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गोठ्यात साठवण केलेला चारा भिजल्याने शेतकरी बांधवांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे चिचखेडा सिम येथे वादळाने कडुनिंबाचे झाड उन्मळून जनावरांच्या गोठ्यावर पडल्याने बाळू पाटिल यांच्या बैलजोडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे विद्युत तारा तुटून गोठ्याला आग लागल्याने शेतीपयोगी साहित्य जळून राख झाले आहे.
खरिप हंगाम तोंडावर आलेला असुन या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी करून प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या सोबत संपर्क साधुन नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदतीचे प्रस्ताव सादर करण्या बाबत तसेच विमा कंपन्यांना निर्देश देण्याबाबत चर्चा केली तसेच सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असुन आचारसंहिता शिथिल करून
नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना खरिपाच्या तोंडावर तात्काळ मदत मिळावी यासाठी निवडणूक आयोग आणि सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले
यावेळी रामदास पाटील,कैलास चौधरी चिचखेडा सिम सरपंच पांडुरंग पाटिल, सुभाष पाटिल, विनोद कोळी,रामराव पाटील, किरण वंजारी, शाम सोनवणे,
नईम बागवान,अतुल पाटिल,दिलीप पाटिल,शिरसाळा सरपंच शांताराम बोरसे, प्रवीण पाटील,अमोल बोरसे,प्रकाश पाटील,
दीपक किनगे, महेंद्र बोंडे, आकाश प्रकाश पाटील, राजू फिरके, सुरेश तिडके,पराग फिरके,प्रबोध पाटील,
मनुर सरपंच अमोल हळपे, सुरेश धनगर चिखली सरपंच धनराज पाटील, अमोल सोनवणे,विकास पाटील,प्रकाश वाघ,लीना वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.










