Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमोल शिंदे यांची रखडलेले प्रश्न अधिवेशनात मांडण्यासाठी आमदारांना रोखठोक स्मरणपत्रिका

najarkaid by najarkaid
July 4, 2021
in Uncategorized
0
भडगावात आमदारांच्या नाटकी आंदोलनाने घेतला महावितरणाच्या निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी- अमोल शिंदे
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा-येथील भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यातील रखडलेल्या समस्यांबाबत आमदारांनी गेल्या सात वर्षात विधानसभेत चकार शब्द देखील काढला नसुन ते या समस्यांवर फक्त स्थानिक स्तरावर पत्रकार परिषदा घेऊन व चमकोगिरी करत फक्त समस्यांचे राजकारण करत असतात आणि पाचोरा व भडगाव तालुक्यातील जनतेला प्रत्येक निवडणुकीत या सर्व समस्यांबाबत आश्वासित करून निवडणुका जिंकण्यासाठी त्यांच्या भावनांशी खेळत असतात.परंतु प्रत्यक्षात या समस्यांबाबत त्यांनी आजपावतो विधानभवनात चकार शब्द काढला नसून त्यांना होऊघातलेल्या अधिवेशनाआधी आठवण म्हणून भाजपाचे अमोल शिंदे यांनी स्मरणपत्रिका काढून खालील समस्यांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

१) गेल्या दोन महिन्यापूर्वी मागील रब्बी हंगामाचचा शेतमाल विक्रीसाठी पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतीसंघाकडून ज्वारीसाठी जवळपास २००० शेतकऱ्यांनी व मक्यासाठी १३०० शेतकऱ्यांनी आणि गहू साठी २० शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली होती.दोन महिने होऊन देखील खरेदी होत नव्हती त्यासाठी भारतीय जनता पार्टी च्या प्रयत्नाने प्रत्यक्षात २२ जून रोजी खरेदीला सुरुवात झाली.परंतु त्यातही पाचोरा तालुक्यातून फक्त ३९ शेतकऱ्यांची व भडगाव तालुक्यातील ८३ शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करून खरेदी बंद केली गेली. आता उर्वरित शेतकऱ्यांच्या शेतमालाचे काय ? व कधी खरेदी होईल याबाबत अधिवेशनात आमदार महोदयांनी स्वतःच्या सरकारला जाब विचारावा व शेतकरी बांधवांचा हा ज्वलंत प्रश्न मार्गी लावावा.

२) महावितरणकडून अजूनही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज कनेक्शन तोडणी सुरूच आहे.व शेतकऱ्यांचे नादुरुस्त झालेले ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याशिवाय दिले जात नाही.त्यासाठी आमदारांनी सत्ताधारी पक्षात असून देखील शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण करत नौटंकी आंदोलन केले होते.तरी देखील शेतकर्‍यांची वीज तोडणी थांबलेली नाही. तरी आमदारांनी सदर विषय अधिवेशनात लावून ठेवावा त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री व त्यांच्याच सरकारमधील ऊर्जामंत्री असल्याने त्यांनी तसे आदेश काढण्यासाठी सरकारला भाग पाडावे.

३) भडगाव शहरात अनिमित होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गिरणा नदीवर बंधारा बांधून जलशुद्धीकरण केंद्र स्थापन करून स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा व्हावा याची मागणी प्रामुख्याने करावी जेणेकरून दरवर्षी भडगाव येथील जनतेचे होणारे हाल कमी होतील.

४) भडगाव येथील जनतेने नेहमी मागणी लावून ठेवलेला व आमदारांनी देखील आश्वासित केलेला मटन मार्केट ते भडगाव पेठ पुलाचे आजपावेतो काम सुरु झाले नसून भडगाव येथील जनतेला दैनंदिन जीवनात याचा त्रास सहन करावा लागत आहे.तरी आमदार महोदयांनी अधिवेशनात या विषयावर त्वरित काम सुरू होणे संदर्भात मागणी करून हा विषय मार्गी लावावा.

५) पाचोरा-भडगाव तालुक्यात एम.आय.डी.सी.(औद्योगिक वसाहत) विकसित करण्यासंदर्भात फक्त आमदार महोदयांनी वल्गना केल्या असून प्रत्यक्षात कामाची सुरुवात कुठेच झालेली दिसून येत नाही. तरी अधिवेशनात सदर विषयावर चर्चा व्हावी.

६) मैत्रेय कंपनी मध्ये ग्राहकांनी गुंतवणूक केलेले पैसे त्यांना त्वरित परत मिळवुन देण्यासाठी आमदार झाल्यावर सहा महिन्यात पैसे मिळवुन देईल असे त्यावेळी गुंतवणुक दारांना आश्वासित केले होते.यासाठी आमदार फक्त स्थानिक स्तरावर बैठका घेऊन जनतेला खोटी आश्वासने देतात यासंदर्भात अधिवेशनात आमदारांनी विशेष चर्चा करून हा देखील विषय मार्गी लावावा.

७) कोरोना काळात आमदार महाशयांनी पाचोरा व भडगाव येथे पंधरा दिवसात स्वतंत्र ऑक्सीजन प्लांट कार्यान्वित करू व लवकरांत-लवकरात जिल्हा उप-रुग्णालयाचे काम सुरू करू असे सांगून जागेची पाहणी देखील केली परंतु अजून पर्यंत ऑक्सीजन प्लांट व जिल्हा उप-रुग्णालय कागदावरच आहे.तरी आमदार महोदयांनी तिसऱ्या लाटेचा धोका बघता या संदर्भात देखील अधिवेशनात आवाज उठवावा.

८) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बघता डेल्टा विषाणूचा संसर्ग लक्षात घेऊन पाचोरा व भडगाव मधील खिळखिळी झालेली आरोग्य व्यवस्था सुरळीत करून योग्य त्या उपाययोजना वेळे आधी मतदार संघात कशा कार्यान्वित करता येतील यावर चर्चा करून मागणी करावी.

या वरील सर्व पाचोरा व भडगाव तालुक्यातील समस्याबाबत आमदार महाशय या वेळी नक्कीच अधिवेशनात परखडपणे आपल्या सरकारला जाब विचारून सदर समस्या मांडतील अशी अपेक्षा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खिर्डी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ रावेर तालुका कार्यकारिणी ची मासिक सभा उत्साहात पार पडली

Next Post

माजीमंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह बारा आमदारांवर निलंबणाची कारवाई

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
कोरोनातून बरं होताचं पहिल्याच दिवशी गिरीश महाजन पोहचले जळगाव येथील कोविड रुग्णालयात… यावेळी नेमकं काय  म्हणाले आ. महाजन वाचा…

माजीमंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह बारा आमदारांवर निलंबणाची कारवाई

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us