पाळधी – 21 डिसेंबर, जागतिक योगा दिनानिमित्त आज पाळधी येथील इंपेरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये जागतिक ध्यान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, मानसिक शांतता, एकाग्रता व सकारात्मक विचारांची सवय निर्माण व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी वर्ग 1 ते 10 वी चे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी व शाळेचे अध्यक्ष इंजि नरेश चौधरी यांनी सहभाग नोंदविला, योगा शिक्षक सौ उज्वला होले यांनी आपल्या जीवनातील योगा, ध्यान चे महत्व या ठिकाणी पटवून दिले.










