Waqf Act 2025 Protest Jalgaon : सरकारला संवैधानिक मार्गाने पाठ दाखवून निषेध जळगावमध्ये (Waqf Rights India) वक्फ कायदा २०२५ आणि ३ जुलैच्या राजपत्र अधिसूचनेच्या निषेधार्थ अनोखे “पाठ दाखवून” आंदोलन करण्यात आले. संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही, असा ठाम निर्धार.Waqf Act 2025 Protest Jalgaon

१० जुलै २०२५ रोजी वक्फ बचाव समिती जळगावचे मुफ्ती खालिद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि फारुख शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाबाहेर शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली आणि सरकारला पाठ दाखवून लक्ष्य करण्यात आले. पाठी मागूनच या गॅजेट्स ला फाडण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात जातानाही पाठ दाखवून प्रवेश करण्यात आला.Waqf Act 2025 Protest Jalgaon

केंद्र सरकारने जारी केलेल्या वक्फ कायदा २०२५ आणि ३ जुलै २०२५ च्या (Gazette Notification Protest) राजपत्र अधिसूचनेच्या निषेधार्थ हे निदर्शने करण्यात आले.
सरकारने कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून हे राजपत्र प्रसिद्ध केले आहे, ज्यामुळे नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि संविधानात दिलेल्या न्यायाच्या भावनेला धक्का पोहोचला आहे.Waqf Act 2025 Protest Jalgaon

निदर्शनाचे मुख्य मुद्दे:
वक्फ कायदा २०२५ तात्काळ मागे घ्यावा.(Waqf Law Opposition)
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या निकालाची वाट पाहिली पाहिजे.(wait for suprime court decision)
या कायद्याद्वारे जमिनींचे बेकायदेशीर घोषित करणे तात्काळ थांबवावे.
(Constitutional Protest Waqf)
वक्फ बोर्डाला असंवैधानिक अधिकार देऊ नयेत.
पाठमारी आंदोलन करण्याचा अर्थ काय
सरकार न्यायापासून पाठ फिरवत असल्याने आम्ही आमची पाठ फिरवली आहे.स्थगितीनंतरही राजपत्र न्यायाचा अनादर करत आहे.आता जर सरकार न्यायाकडे दुर्लक्ष करती आहे तर आम्ही पाठ फिरवत आहोत.भारत संविधानाचा अपमान सहन करणार नाही.वक्फ कायदा मागे घ्या, न्यायाचे पालन करा.आम्ही गप्प राहून ही सरकारला खूप काही सांगत आहोत, आमच्या पाठीकडे पहा.Waqf Act 2025 Protest Jalgaon

निदर्शनानंतर निवासी उप जिल्हाअधिकारी श्रीमती जयश्री माळी यांना अफान रहीम पटेल यांच्या हस्ते निवेदन देण्यात निवेदन देण्यात आले त्या वेळी मुफ्ती खालिद , फारूख शेख, नदीम मलिक, हाफिज रहीम पटेल उपस्थित होते.
निवेदन हे महामहिम राष्ट्रपती, भारताचे मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांना देण्यात आले, ज्यामध्ये हे सर्व मुद्दे गांभीर्याने उपस्थित करण्यात आले आणि केंद्र सरकारने या प्रकरणाची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली.वक्फ बचाव समिती जळगावचा हा संघर्ष जोपर्यंत हा काळा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत सुरूच राहील.Waqf Act 2025 Protest Jalgaon
यांची होती उपस्थिती
मुफ्ती खालिद, फारूक शेख, नदीम मलिक, हाफिज रहीम पटेल, आरिफ देशमुख, मतीन पटेल, अनिश शाह, मजहर खान, युसूफ खान , अनवर शिकलगार, सय्यद चांद, मतीन सैयद, नजमोद्दीन शेख, युसुफ खान, सईद फैयाज,साहिल खाटीक, निहाल शेख, अजहर देशमुख, मुजाहिद शेख आदी उपस्थित होते.