मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन एनडीएच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल सी.पी. राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले.
मुंबई – कोल्हापूर दौऱ्यावरून परत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (१७ ऑगस्ट) मुंबईतील राजभवन येथे जावून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) वतीने राधाकृष्णन यांची भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

राज्यपाल राधाकृष्णन यांना NDA ने उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केल्याने राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राजभवन परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले.
राधाकृष्णन यांच्या दीर्घ राजकीय आणि प्रशासकीय अनुभवामुळे देशाच्या सर्वोच्च पदांपैकी एक असलेल्या उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.