मुंबई, दि. ६: उत्तराखंड राज्यातील धराली (जिल्हा उत्तरकाशी) परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाल्याने खीरगंगा नदीला मोठा पूर येऊन अनेक घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ११ व इतर जिल्ह्यांतील ४० अशा ५१ पर्यटकांचा समावेश असून हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासन तत्पर असून पर्यटकांशी संपर्क करत आहे. यासाठी राज्य शासनामार्फत उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र व उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी संपर्क साधला जात असून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी महाराष्ट्र सदन, दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत. येथील परिस्थितीवर सतत लक्ष ठेऊन पुढील सूचना वेळोवेळी दिल्या जाणार असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे.
संपर्क क्रमांक-
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र : ९३२१५८७१४३ / ०२२-२२०२७९९० / ०२२-२२७९४२२९
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड : ०१३५-२७१०३३४ / ८२१
Latest news 👇🏻
CBSE New Rule :CBSE चा मोठा निर्णय! 8वी ते 12वीसाठी नवीन नियम लागू
केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी 4987 जागांची मोठी संधी!
₹5 लाख ते ₹1 कोटी कव्हरेज – तुमच्यासाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स कोणता?
‘लाडकी बहीण योजना’ : महिलांसाठी रक्षाबंधनाची खास भेट! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 3000 रुपये
वेलदोडे खाण्याचे चमत्कारी फायदे
मतदार यादीत तुमचं नाव आहे का? 2025 साठी नाव कसं शोधाल ते येथे वाचा
80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम
Motorola G85 5G स्मार्टफोनवर 50% सवलत – 21 हजाराचा मोबाईल Sale मध्ये फक्त ₹10,999
Meesho व्यवसाय करून कमवा लाखो रुपये | घरबसल्या कमाईची संधी, कुठलीही गुंतवणूक नाही!
संबंधीत बातम्या👇🏻
बजाज फायनान्सचे पर्सनल लोन घेणे झाले सोपे! 40 हजार ते 55 लाख पर्यंत मिळतंय कर्ज…
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? हा इन्शुरन्स घ्यायचा की नाही?
१० मिनिटात कर्ज मिळवा, खरं की खोटे?
Personal Loan 2025: कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा,EMI, पात्रता, आणि सर्वोत्तम बँका कोणत्या?
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती