SIP | Systematic Investment Plan (SIP) गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय ठरत आहे. AMFI च्या ताज्या आकडेवारीनुसार जुलै २०२५ मध्येच SIP द्वारे तब्बल २८,००० कोटी रुपये गुंतवणूक झाली असून ९.११ कोटींपेक्षा अधिक सक्रिय खातेधारक यात सहभागी आहेत. फक्त १०० रुपयांपासून SIP सुरू करण्याची सुविधा, rupee-cost averaging चा फायदा आणि शिस्तबद्ध बचतीचं साधन म्हणून SIP लोकप्रिय झाली आहे.

तरी सुद्धा, बाजार अस्थिर झाला की अनेक गुंतवणूकदार SIP बंद करतात किंवा मध्येच थांबवतात. यामुळे दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा प्रवास अर्धवट राहतो. खाली दिलेल्या ५ सामान्य SIP चुका टाळल्यास तुमचं आर्थिक उद्दिष्ट गाठणं अधिक सोपं होईल.
तुमचा क्रेडिट स्कोर लो आहे का?
पर्सनल लोन मिळवण्यासाठी या 6 ट्रिक्स ठरतील उपयोगी!
१. चुकीचा फंड निवडणे
अनेक वेळा लोक संशोधन न करता मित्र-नातेवाईकांच्या सल्ल्यावर SIP सुरू करतात. पण प्रत्येक फंड सर्व गुंतवणूकदारांसाठी योग्य असतोच असं नाही.
दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी – Equity Mutual Funds अधिक फायदेशीर ठरतात.
अल्पकालीन गरजांसाठी – Debt Funds किंवा Balanced Funds अधिक योग्य ठरतात.
म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी आपले goals, risk capacity आणि time horizon पाहूनच फंड निवडणे महत्त्वाचे आहे.
२. SIP रक्कम न वाढवणे
बहुतेक लोक सुरुवातीला ठेवलेली SIP रक्कम वर्षानुवर्षे तशीच ठेवतात. पण पगार किंवा उत्पन्न वाढल्यावर SIP amount देखील वाढवायला हवी. यालाच Step-up SIP म्हणतात.
👉 उदाहरणार्थ, दरवर्षी फक्त १०-१५% SIP वाढवल्यास भविष्यातील corpus प्रचंड मोठं होऊ शकतं.

३. अल्पकालीन दृष्टीकोन ठेवणे
SIP ही short-term profit साठी नसून long-term wealth creation साठी असते. २-३ वर्षांत मोठा परतावा मिळेल अशी अपेक्षा ठेवणं ही मोठी चूक आहे.
SIP चा खरा जादू १०-१५ वर्षांनंतर किंवा त्याहून अधिक काळानंतर दिसतो.
त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार योग्य कालावधी ठरवावा.
४. पोर्टफोलिओचा आढावा न घेणे
SIP सुरू केल्यानंतर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
बाजारातील परिस्थिती, फंडाचा परफॉर्मन्स आणि तुमची उद्दिष्टं वेळोवेळी बदलू शकतात.
त्यामुळे दरवर्षी किमान एकदा पोर्टफोलिओ review करणं आवश्यक आहे.
सतत खराब परफॉर्मन्स करणारा फंड ओळखून त्यात बदल करणं किंवा सल्लागाराशी चर्चा करणं योग्य राहील.
५. बाजार घसरला की SIP बंद करणे
बाजारात घसरण झाली की अनेक गुंतवणूकदार घाबरून SIP थांबवतात. पण प्रत्यक्षात हा कालावधी गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम संधी असतो. कारण
यावेळी units स्वस्त मिळतात,
भविष्यातील वाढीवर अधिक परतावा मिळतो.
SIP मधील सातत्य हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.
टॉप 5 SIP कंपन्या आणि त्यांच्या अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिलेल्या आहेत :
1. ICICI Prudential Mutual Fund
👉 http://www.icicipruamc.com
2. UTI Mutual Fund
👉 http://www.utimf.com
3. Axis Mutual Fund
👉 https://www.axismf.com
4. HDFC Mutual Fund
👉 https://www.hdfcfund.com
5. Aditya Birla Sun Life Mutual Fund
👉 https://www.adityabirlacapital.com/sunlife-mutual-fund
निष्कर्ष
Mutual Fund SIP ही संपत्ती निर्माण करण्याची सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. पण चुकीचा फंड निवडणे, SIP रक्कम न वाढवणे, अल्पकालीन अपेक्षा ठेवणे, पोर्टफोलिओचा आढावा न घेणे आणि बाजार घसरला की SIP थांबवणे या पाच चुका परताव्यावर गंभीर परिणाम करू शकतात.जर या चुका टाळल्या आणि SIP ला शिस्त, संयम व योग्य रणनीतीसोबत पुढे नेलं, तर SIP तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचा विश्वासू साथीदार ठरू शकते.
महत्वाचे :- Mutual Fund विक्रीचे नियम: चुकीच्या Exit ने कसा होतो तोटा?
महत्वाचे :- पर्सनल लोन घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
हे पण वाचा :- Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा
हे पण वाचा :- Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर
हे पण वाचा :- टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज!
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
BSF सीमा सुरक्षा दलात 1012 हेड कॉन्स्टेबल पदांची भरती : 12 पास लगेच अर्ज करा !
5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!
बँक ऑफ महाराष्ट्र : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका
नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५
LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी