Shirdi Hotels Sealed – शिर्डीत अवैध वेश्या व्यवसाय प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चार हॉटेल्स एक वर्षासाठी सील; पोलिसांच्या धडक कारवाईने खळबळ.
शिर्डी : शिर्डी शहरात हॉटेल्सच्या आडून चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई करत चार हॉटेल्स वर्षभरासाठी सील केली आहेत. या धडक कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी समोर आला होता धक्कादायक प्रकार
शिर्डीत काही दिवसांपूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी हॉटेल्सवर पिटा कायद्यानुसार कारवाई केली होती. त्या कारवाईत अवैध देहविक्रीचा धंदा उघडकीस आला. त्यानंतर पोलिस प्रशासनाने या संदर्भात न्यायालयात सविस्तर अहवाल सादर केला होता.
न्यायालयाच्या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देत, ज्या आस्थापनांमध्ये वेश्या व्यवसाय सुरु होता त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढत संबंधित हॉटेल्स सील करण्याची कार्यवाही केली.
ही चार हॉटेल्स सील 🚫
हॉटेल साई वसंत विहार
हॉटेल शिर्डी साई इन
हॉटेल साई वीरभद्र
हॉटेल साई शीतल
या चार हॉटेल्सवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने एक वर्षासाठी सील लावण्यात आले आहे.
अवैध धंद्याला चाप बसणार का?
शिर्डी हे धार्मिक पर्यटनस्थळ असल्याने येथे दररोज हजारो भाविकांचे आगमन होते. मात्र, अशा पवित्र स्थळी हॉटेल्सच्या आडून अवैध व्यवसाय सुरु असल्याचे समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे किमान काही दिवस तरी अशा हॉटेल व्यवसायांना आळा बसणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
बँक ऑफ महाराष्ट्र : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका
नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५
LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी