Sex Racket Exposed in Mumbai | मुंबईच्या अंधेरीतील एका हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला असून, एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून मॅनेजरला अटक केली आहे. रॅकेटमध्ये व्हिएतनामी महिलांचा सहभाग असून मालक फरार आहे.
मुंबईत हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड, एमआयडीसी पोलिसांची कारवाई
मुंबई शहर पुन्हा एकदा धक्कादायक घटनांमुळे हादरलं आहे. अंधेरीच्या कुर्ला रोडवर टाइम स्क्वेअरजवळील एका नामांकित हॉटेलमध्ये उच्चभ्रू सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला असून या रॅकेटमध्ये परदेशी महिलांचाही सहभाग आढळून आला आहे.
Breking news : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात
एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकाने या हॉटेलवर छापा टाकून संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, या बेकायदेशीर धंद्यामागे एका आंतरराष्ट्रीय एजंट नेटवर्कचं सूक्ष्म नियोजन असल्याचा संशय पोलिसांना आहे. Sex Racket Exposed in Mumba

सरकारी नोकरी कुठे? वाचा – Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी
हॉटेलच्या आठव्या आणि नवव्या मजल्यावर चालत होता रॅकेट
एमआयडीसी पोलिसांना एका विश्वासार्ह सूत्रामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे अंधेरीतील एका हायप्रोफाईल हॉटेलवर नजर ठेवण्यात आली. या हॉटेलच्या आठव्या आणि नवव्या मजल्यावर अनेक परदेशी महिला राहात असल्याचं निरीक्षणात आलं. तपास अधिकाऱ्यांनी ही माहिती वरिष्ठ पातळीवर शेअर केली आणि कारवाईसाठी सखोल योजना आखण्यात आली. Sex Racket Exposed in Mumba

त्यानुसार, पोलिसांनी हॉटेलमध्ये एक बनावट ग्राहक पाठवला. हॉटेल मॅनेजर आलम खलील चौधरी याने या बनावट ग्राहकाला ६,००० रुपये देऊन ‘सेवा’ पुरवण्याचं मान्य केलं आणि त्याला आठव्या मजल्यावरील खोलीत घेऊन गेला. तिथं एक परदेशी महिला उपस्थित होती. या महिलेने उघड केलं की अन्य दोन महिला दुसऱ्या खोलीत राहतात आणि त्या देखील वेश्याव्यवसायात गुंतल्या आहेत.
संबंधित बातमी👇🏻
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
तीन व्हिएतनामी महिला ताब्यात; रॅकेटमागे आंतरराष्ट्रीय कनेक्शन
बनावट ग्राहकाच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही मजल्यांवर छापा टाकत तिन्ही महिलांना ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशीत महिलांनी वेश्याव्यवसायात सहभाग असल्याचं कबूल केलं. तपासादरम्यान हेही समोर आलं की या महिलांचे फोटो ऑनलाइन वेबसाइट्सवर टाकले जात होते आणि एजंटकडून इच्छुक ग्राहकांशी थेट संपर्क साधला जात होता.

या महिलांची ओळख व्हिएतनामी नागरिक म्हणून पटली असून त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. वैद्यकीय तपासणी पूर्ण करून त्यांना सध्या एका आश्रयगृहात हलवण्यात आलं आहे. भारतातील व्हिएतनामी दूतावासालाही याची माहिती देण्यात आली आहे. Sex Racket Exposed in mumbai
👇🏻सरकारी योजना वाचा👇🏻
आयुष्यमान भारत योजना, ५ लाखाचा लाभ, आजच अर्ज करा
शासकीय योजना मुलींना १ मिळताय लाख रुपये, आजच करा अर्ज!
मुख्यमंत्री सहायता निधी योजना कशी मिळवावी? अर्ज कसा करावा, संपूर्ण माहिती वाचा..
राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी ; असे काढाल आभा आरोग्य कार्ड !
‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाची मुदत वाढवली ; महिलांना मिळताय ‘हे’ मोठे लाभ
महिला व बालविकास विभागाच्या ‘या’ ५ योजनांचा लाभ घ्या ; संपूर्ण डिटेल्स वाचा
माहितीचा अधिकारी अर्ज कसा करावा, संपूर्ण माहिती वाचा
हॉटेल मॅनेजर,मालक फरार
हॉटेल मॅनेजर आलम खलील चौधरीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर भारतीय दंड संहिता (BNS) आणि अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान हेही निष्पन्न झालं की हॉटेल मालक अब्दुल सलाम यांच्या निर्देशानुसार हे सर्व रॅकेट चालवण्यात येत होतं. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

एजंट नेटवर्कचा शोध सुरू
या प्रकरणात ऑनलाइन एजंटची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. महिलांचे फोटो शेअर करणं, सौदे निश्चित करणं, ग्राहकांना हॉटेलपर्यंत पोहोचवणं अशा अनेक गोष्टी एजंटमार्फत केल्या जात होत्या. यामुळे रॅकेट मागे एक आंतरराष्ट्रीय सेक्स ट्रॅफिकिंग जाळं असल्याचा संशय पोलिसांना आहे. एजंटच्या फोन कॉल्स, सोशल मीडिया अकाउंट्स, पेमेंट गेटवे ट्रॅक करून पोलिस आता पुढचा तपास करत आहेत.
सेक्स रॅकेटविरोधात कडक कारवाईचा इशारा
या कारवाईनंतर एमआयडीसी पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, मुंबईत अशा बेकायदेशीर धंद्यांना अजिबात थारा दिला जाणार नाही. कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात अशा प्रकारच्या रॅकेट्सना पायबंद घालणं हे अत्यंत गरजेचं आहे. या घटनेनंतर हॉटेल व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत, विशेषतः जेव्हा परदेशी नागरिकांच्या सहभागासह अवैध धंदे चालवले जातात. पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे हे रॅकेट उघडकीस आलं, मात्र यामागे अजून कोणते घटक सक्रिय आहेत, याचा शोध घेणं हे पुढील तपासात महत्त्वाचं ठरणार आहे. Sex Racket Exposed in Mumba
या महत्वाच्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?
Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!
पुरुष गर्भनिरोधक गोळी, जोक नाही खरं आहे, वैज्ञानिक क्रांती
समुद्रात खोलवर काय असतं? | रहस्य, सुंदर आणि थरारक जग!
5 कोटींचा चेक गिफ्ट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?
Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या
Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय
जगात असा कोणता सजीव आहे जो वाऱ्यापेक्षा जलद धावतो?”
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा
महत्वाची माहिती : Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा
डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi
Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?
घर बसल्या पैसे कमवायचे, हे आहेत मार्ग
Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?
Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..
माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा – संपूर्ण मार्गदर्शक RTI 2025