जळगाव, दि. ११ डिसेंबर २०२५ — जळगाव शहरातील वाल्मिक नगर, पक्कीचाळ येथील रहिवासी व समाजकार्याच्या क्षेत्रात सक्रिय असलेले रविंद्र उर्फ नाना रामदास ठाकरे यांचे आज (बुधवार) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते शैलेश (आप्पा) रामदास ठाकरे यांचे मोठे बंधू तसेच रितेश रविंद्र ठाकरे यांचे वडील होत.

स्व. ठाकरे यांची अंत्ययात्रा उद्या दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या निवासस्थानातून वाल्मिक नगर, पक्कीचाळ येथून निघणार असून नेरी नाका स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगे, बहीण माजी नगरसेविका सुमनताई ठाकरे असा परिवार असून, संपूर्ण वाल्मिक नगरासह दिनकर नगर, कांचन नगर, तानाजी मालुसरे नगर, हरी ओम नगर परिसरात शोककळा पसरली आहे.
स्व. ठाकरे हे सामाजिक कार्यात सदैव तत्पर, मनमिळावू व जनसामान्यात लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.














