Pune Rave Party : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांचा संताप; जावयाला पहिल्या क्रमांकाचा आरोपी केल्यामुळे पोलिसांवर गंभीर आरोप.
पुण्यातील चर्चित रेव्ह पार्टी प्रकरणावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुण्यात थेट पत्रकार परिषद घेत आपल्या जावयाच्या अटकेवर पोलिसांच्या कारवाईवर जोरदार टीका केली असून अनेक प्रश्न निर्माण केले आहे.

“ड्रग्ज घेतले नाही, कोणताही गुन्हा दाखल नाही, तरी प्रांजल खेवलकर यांना एक नंबरचा आरोपी का करण्यात आलं?”जावई दोषी असतील नक्कीच कारवाई करा पण निव्वळ मला बदनाम करण्यासाठी जावयाला अडकवण्यात येत असेल तर हे चुकीचं आहे. अशा संतप्त भावना खडसे यांनी व्यक्त केल्या आहे. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्हं उभी राहिली आहेत.

एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत पुणे पोलिसांवर थेट गंभीर आरोप केले. ते म्हणाले: “प्रांजल खेवलकर यांच्यावर एकही गुन्हा नाही.त्यांनी ड्रग्ज घेतले नाही मग ते Pune Rave Party मधील एक नंबरचे आरोपी कसे? हे सर्व केवळ खडसे कुटुंबाची बदनामी करण्यासाठी केले जात असल्याचं त्यांनी सांगितले.

“रेव्ह पार्टी म्हणजे काय? तिथे संगीत नव्हतं, गोंधळ नव्हता. मग पोलिस रेव्ह पार्टी म्हणतायत ते कशाच्या आधारावर?” खडसे यांनी पत्रकार परिषदेत असा सवाल उपस्थित केला आहे.रेव्ह पार्टीची व्याख्या पोलिसांना माहिती आहे का? प्रायव्हेट लाईफचे व्हिडीओ मीडियासोबत शेअर करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का? पोलिसांनी चेहऱ्यांचे व्हिज्युअल्स का दाखवले? असे अनेक प्रश्न खडसे यांनी पत्रकार परिषदेतून केले.याशिवाय त्यांनी असा दावाही केला की प्रांजल खेवलकर यांच्यावर साध्या वेशातील पोलिसांनी पाळत ठेवली होती, आणि पार्किंगमधील CCTV फुटेजमध्ये पोलिस दिसून आले.

Pune Rave Party : राजकीय सूड?
खडसे यांनी हे प्रकरण राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप केला. ते म्हणाले:” प्रफुल लोढा हनी ट्रॅपप्रकरणात सरकार तत्परता दाखवत नाही. मात्र खडसे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी पोलीस तत्पर आहेत.”प्रांजल खेवलकर यांच्यावर ड्रग्ज सेवनाचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही.एका महिलेच्या बॅगेत ड्रग्ज सापडले, तरी ती प्रथम क्रमांकाची आरोपी नाही.यामुळेच खडसे यांनी असा सवाल केला की, “एका महिलेकडे अमली पदार्थ सापडले, तरी तिला आरोपी न करता आमच्या जावयाला का आरोपी केलं?”

Pune Rave Party प्रकरण आता केवळ कायदेशीर विषय न राहता एक राजकीय संघर्षाचं रूप घेत आहे. खडसे यांच्या या आरोपांमुळे पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी
https://x.com/abpmajhatv/status/1950057510599348525?t=feiymenesFsR0Jx313IzKA&s=19
संबंधीत बातम्या👇🏻
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर