मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला नवा वळण मिळाले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणावरून दाखल झालेल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले असून राज्य सरकारसाठी नवा पेच निर्माण झाला आहे.
मनोज जरांगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सातत्याने उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनादरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे सरकार आणि काही याचिकाकर्त्यांचे म्हणणे असले तरी न्यायालयाने जरांगे यांच्या आंदोलनाच्या अधिकाराला मान्यता दिली आहे. त्यामुळे सरकारला अडचणीत टाकणारा हा आदेश ठरला आहे.
आंदोलन आणि न्यायालयीन सुनावणी
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतरांनी जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकांमध्ये आंदोलन थांबवावे, उपोषणावर मर्यादा आणाव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. सुनावणीत सरकारनेही जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान 30 आणि 31 ऑगस्ट रोजी परवानगी नव्हती, तरीही नियम मोडले गेले असल्याचा दावा केला.
न्यायालयाचे निर्देश
2 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार
आंदोलन स्थळी जेवण-पाण्याचे साहित्य आणण्यास तात्पुरती परवानगी
जरांगे यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यास तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक
5 हजार लोकांना अटी-शर्तींसह परवानगी देण्याचा अधिकार सरकारला, मात्र नियमांचे पालन बंधनकारक
आंदोलकांना दिलासा
या आदेशामुळे जरांगे यांचे आंदोलन सुरू ठेवण्याचा अधिकार कायम राहिला आहे. न्यायालयाने सरकारच्या मागणीवर लगेच निर्बंध लादले नाहीत. त्यामुळे आंदोलकांसाठी हा निर्णय दिलासा देणारा ठरला आहे.
राज्य सरकारपुढे पेच
सरकारला आंदोलकांवर थेट बंदी आणता आली नाही. उलट, जरांगे यांच्या आंदोलनाला कायदेशीर मान्यता मिळाल्याने आता राज्य सरकारसाठी मोठा पेच उभा राहिला आहे. न्यायालयाने “अटी पाळल्या तर आंदोलन सुरू राहू शकते” असा स्पष्ट संदेश दिल्याने पुढील काही दिवसात सरकारची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
BSF सीमा सुरक्षा दलात 1012 हेड कॉन्स्टेबल पदांची भरती : 12 पास लगेच अर्ज करा !
5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!
बँक ऑफ महाराष्ट्र : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका
नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५
LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी