Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Mantrimandal Nirnay : आजचे मंत्रिमंडळ निर्णय वाचा!

najarkaid live by najarkaid live
August 12, 2025
in राज्य
0
Cabinet meeting Maharashtra

Cabinet meeting Maharashtra

ADVERTISEMENT

Spread the love

Mantrimandal Nirnay – महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले ताजे निर्णय, नवी धोरणे, शासकीय योजना व महत्वाच्या घोषणांची  सविस्तर माहिती.

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकास, कल्याण व प्रशासनाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. हे Mantrimandal Nirnay नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर, शासकीय योजनांवर आणि आगामी धोरणांवर थेट परिणाम करतात. ताज्या निर्णयांमुळे पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग आणि रोजगार क्षेत्रात नवे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने हे निर्णय जाणून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून शासकीय धोरणांचा लाभ वेळेत घेता येईल.

Cabinet meeting Maharashtra
Cabinet meeting Maharashtra

महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती; लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर

महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आज सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
राज्याच्या पोलीस दलात सन २०२४ दरम्यान रिक्त असलेली व २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहेत. भरण्यात येणारी पदांची संख्या अशी, पोलीस शिपाई – १२ हजार ३९९, पोलीस शिपाई चालक – २३४, बॅण्डस् मॅन – २५, सशस्त्र पोलीस शिपाई – २ हजार ३९३, कारागृह शिपाई – ५८०. एकूण १५ हजार, ६३१. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.
भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

Cabinet meeting Maharashtra
Cabinet meeting Maharashtra

राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी, तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

०००

राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ; क्विंटलमागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या १५० रुपयांऐवजी १७० रुपये मार्जिन मिळणार आहे.

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना ५३ हजार ९१० रास्तभाव दुकानदारांमार्फत ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रीक पडताळणी करून अन्नधान्य, साखर व इतर वस्तुंचे वितरण करण्यात येते.

या दुकानदारांना केंद्र सरकारकडून ४५ रुपये आणि राज्य शासनाकडून १०५ रुपये असे एकूण क्विंटलमागे १५० रुपये मार्जिन म्हणून दिले जात होते. या मार्जिन रकमेत वाढ कऱण्याची विनंती या दुकानदारांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार या मार्जिनमध्ये क्विंटलमागे २० रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार क्विंटलमागे रास्त भाव दुकानदारांना १७० रुपये (१७०० रुपये प्रति मेट्रीक टन) असे मार्जिन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे ९२ कोटी ७१ लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद केली जाणार आहे.

०००

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी उडान योजनेच्या धर्तीवर एक वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट (व्हायअबिलिटी गॅप फंडिंग- व्हीजीएफ) निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना विमानप्रवास परवडेल यादृष्टीने उडान (रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम) योजना सुरू केली आहे. सोलापूर विमानतळासाठीदेखील ही योजना लागू होणार आहे. ही योजना लागू होईपर्यंत वर्षभरासाठी प्रति आसन ३ हजार २४० रुपये दराने (शंभर टक्के व्हिजीएफ) व्यावहारिकता तूट म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवास दर कमी होण्यास मदत होणार आहे.

या निर्णयानुसार सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे या हवाई मार्गासाठी स्टार एअर कंपनीस दर आसनामागे हा व्यावहारिक तूट निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरीता १७ कोटी ९७ लाख ५५ हजार २०० रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

Cabinet meeting Maharashtra
Cabinet meeting Maharashtra

या विमानतळासाठी उडान योजना लागू झाल्यानंतर शासनाकडून देण्यात येणारा हा निधी बंद करण्यात येईल व केंद्र सरकारच्या उडान योजनेप्रमाणे २० टक्के व्यवहारिकता तूट (व्हिजीएफ) देण्यात येणार आहे.

०००

तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ

कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांच्या विविध योजनांतर्गत कर्ज प्रकरणातील जामिनदाराबाबतच्या अटी आणि शर्तीमध्ये सुधारणा करण्यास तसेच महामंडळाना देण्यात येणाऱ्या शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे लघुउद्योजकांना कर्ज घेण्याची प्रक्रिया आधिक सुटसुटीत होणार तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार आहे.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून स्वतःच्या आणि राष्ट्रीय महामंडळाच्या विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये मुदत कर्ज योजना, ऋण योजना आणि बीज भांडवल योजना यांचा समावेश आहे.

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या दोन लाख रुपयांपर्यतच्या कर्ज योजनेसाठी लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर किंवा एका जामिनदाराच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविण्यास मान्यता देण्यात आली. दोन ते पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी पूर्वी दोन जामिनदारांची अट होती. आता त्याऐवजी एका जामिनदारांची तरतूद करण्यात आली आहे. हा जामिनदार स्थावर मालमत्ता किंवा नावावर जमीन असलेला किंवा खासगी क्षेत्रातील नोकरदार किंवा शासकीय, निमशासकीय, शासकीय अनुदानित संस्थेतील नोकरदार असावा, अशी तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर लाभार्थी आणि जामिनदारांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविला जाणार आहे.

राष्ट्रीय अनुसूचित जाती मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ (NSCFDC), राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळ (NSKFDC) यांच्या योजना राज्यातील महामंडळामार्फत राबविण्यात येतात. यासाठी राष्ट्रीय महामंडळाकडून राज्य महामंडळास कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला जातो. या कर्जनिधीमधून मुदती कर्ज योजना, बीज भांडवल योजना लघुऋण वित्त योजना, तसेच शैक्षणिक कर्ज योजना राबविल्या जातात.

या योजना राबविण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास ६०० कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास १०० कोटी, आणि संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळास ५० कोटी रुपयांच्या शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली.  यामुळे प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली निघतील त्याचबरोबर नवीन लाभार्थ्यांनाही कर्ज मिळेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

School Girl Rape Case – तिसरीतील विद्यार्थिनीवर शाळेच्या टॉयलेट मध्येच… महाराष्ट्र हादरला!

Next Post

Monsoon Alert in Maharashtra: राज्यात मान्सून सक्रिय; 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, 18 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

August 18, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
Next Post
Monsoon Alert in Maharashtra: राज्यात मान्सून सक्रिय; 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, 18 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज

Monsoon Alert in Maharashtra: राज्यात मान्सून सक्रिय; 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, 18 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज

ताज्या बातम्या

Diwali 2025 Stock Picks: 300-500 रुपये मध्ये गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स

Diwali 2025 Stock Picks: 300-500 रुपये मध्ये गुंतवणुकीसाठी टॉप शेअर्स

October 12, 2025
CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी Gift 1500 रुपये जमा; KYC अनिवार्य

CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी Gift 1500 रुपये जमा; KYC अनिवार्य

October 12, 2025
Global Market Crash: ट्रम्पच्या घोषणेनंतर जग हादरलं

Global Market Crash: ट्रम्पच्या घोषणेनंतर जग हादरलं

October 11, 2025
Unclaimed Money Alert: मिरज व परिसरातील बँकांमध्ये १७६ कोटी रुपये बेवारस,

Unclaimed Money Alert: मिरज व परिसरातील बँकांमध्ये १७६ कोटी रुपये बेवारस, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन – खातेधारकांनी ३१ डिसेंबरपूर्वी करावा संपर्क

October 11, 2025
BRO Recruitment 2025: सीमा रास्ता संघटनेत १० वी आणि ITI धारकांसाठी सुवर्णसंधी – ५४२ पदांसाठी भरती सुरू

BRO Recruitment 2025: 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी सरकारी भरती, 542 पदांसाठी अर्ज सुरू.

October 11, 2025
GST Reduction नंतर RBIचा मोठा निर्णय: आता EMI होणार स्वस्त, कर्जदारांना मिळणार नवीन सुविधा.

GST Reduction नंतर RBIचा मोठा निर्णय: आता EMI होणार स्वस्त, कर्जदारांना मिळणार नवीन सुविधा.

October 11, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us