Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिला सक्षमीकरणासाठी कृतीशील पाऊल; महिलांच्या विकासासाठी सात कार्यालय काम करणार एका छताखाली – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगावच्या महिला व बालकल्याण भवनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

najarkaid live by najarkaid live
August 15, 2025
in जळगाव
0
महिला सक्षमीकरणासाठी कृतीशील पाऊल; महिलांच्या विकासासाठी सात कार्यालय काम करणार एका छताखाली  – पालकमंत्री गुलाबराव पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 15 ऑगस्ट (प्रतिनिधी) – महिलांच्या सक्षमीकरणासाठी फक्त तोंडी बोलून नाही तर कृतीशील काम करून महिलांच्या प्रगतीसाठी अत्यंत सुबक आणि नावीन्यपूर्ण महिला व बालकल्याण भवन जिल्हा नियोजनच्या सहा कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात आले आहे. राज्यात रोल मॉडेल ठरेल असे हे बांधकाम असून, आता महिला व बालकांच्या विकासासाठी कार्यरत असलेली सात विभाग एका छताखाली जोमाने काम करतील, असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

महिला सक्षमीकरणासाठी कृतीशील पाऊल; महिलांच्या विकासासाठी सात कार्यालय काम करणार एका छताखाली  - पालकमंत्री गुलाबराव पाटील
महिला सक्षमीकरणासाठी कृतीशील पाऊल; महिलांच्या विकासासाठी सात कार्यालय काम करणार एका छताखाली – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव शहरातील महाबळ रोडवर बांधलेल्या महिला व बालकल्याण भवनचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी खा. स्मिता वाघ, आ. सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, कार्यकारी अभियंता आर. बी. पाटील, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रफिक तडवी यांसह मान्यवर उपस्थित होते.

शासन महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून, जिल्हा नियोजनातून जिल्ह्यात अकरा ‘बहिणाबाई मार्ट’ उभारण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे महिला बचत गटांना हक्काची शाश्वत जागा मिळणार असून 12 महिने उत्पन्न मिळवून देणारे स्रोत उपलब्ध होतील. जागतिक महिला दिनी या इमारतीच्या भूमिपूजनाची कुदळ पालकमंत्र्यांच्या हस्ते मारली गेली होती, तर केवळ अठरा महिन्यांत हे सुसज्ज भवन उभे राहिले. लोकार्पणही त्यांच्या हस्ते होणे, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

या सुसज्ज भवनामध्ये एकूण सात कार्यालये कार्यान्वित झाली आहेत – जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, बालविकास प्रकल्प अधिकारी जळगाव शहरी प्रकल्प, बालविकास प्रकल्प अधिकारी दक्षिण प्रकल्प, जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र आणि ‘चाईल्ड लाईन’.

   कारागिरांच्या कौशल्याचा गौरव

पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिता वाघ, आ. सुरेश (राजूमामा ) भोळे  यांच्या हस्ते हे सुंदर भवन ज्या कारागिरांच्या कौशल्यपूर्ण हातानी साकारले त्या सर्वांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला.

Spread the love
Tags: #ChildWelfare#Development#Inauguration#jalgaon#JalgaonNews#MaharashtraNews#MahilaBalKalyan#MahilaBalKalyanBhavan#PalakMantri#WomenEmpowerment
ADVERTISEMENT
Previous Post

संबंध ठेवले, चोरून व्हिडीओ काढले; प्रांजल खेवलकर प्रकरणात नवा गुन्हा, महिलेनं उघड केली आपबिती

Next Post

भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

ताज्या बातम्या

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक - महापौर सौ.दिपमाला काळे

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – महापौर सौ.दिपमाला काळे

March 18, 2026
Jalgaon Suicide News : वसतिगृहात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; Instagram वरील ‘तो’ अखेरचा मॅसेज...

Jalgaon Suicide News : वसतिगृहात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; Instagram वरील ‘तो’ अखेरचा मॅसेज…

March 18, 2026
CBSEचा कडक इशारा!शिक्षकांसाठी अलर्ट, पालकांसाठी महत्वाची बातमी..

today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

एकीकडे SBI MF ची कोटींची गुंतवणूक, दुसरीकडे विदेशी एक्झिट—Urban Company मध्ये नेमकं काय चाललंय?

March 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us