Maharashtra Assembly Monsoon Session 2025: बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांमध्ये गुणवत्तेच्या आधारे प्रवेश संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधान परिषदेत मोठी घोषणा केली आहे. या संस्थांमध्ये गुणवत्तेच्या आधारे प्रवेश प्रक्रिया; शिष्यवृत्ती धोरणात होणार बदल, PhD अभ्यासक्रमांवर भर याबाबत शासनाचे धोरण जाहीर केले.Maharashtra Assembly Monsoon Session 2025:
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1940713064631828917?t=mc2L_tRMHnq_Fsy_bmKheA&s=19
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. बार्टी, सारथी, महाज्योती आणि आर्टी या संस्थांमध्ये आता विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती वितरण, परदेशी अभ्यासासाठी संधी यामध्ये एकसंध धोरण राबवले जाणार आहे.Maharashtra Assembly Monsoon Session 2025

सारथी संस्थेतील आकडेवारी आणि नविन दिशा
विधान परिषद आमदार संजय खोडके आणि आमदार अभिजीत वंजारी यांनी ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी)’ कडून घरभाडे भत्ता व आकस्मितता निधी बाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सांगितले की, २०१८ ते २०२५ या कालावधीत ८३ अभ्यासक्रमांमध्ये ३ लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक लाभ देण्यात आले.
तथापि, त्यातील केवळ १% विद्यार्थ्यांनी PhD साठी प्रवेश घेतला असून, त्यांच्या अभ्यासासाठी २८० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. एका विद्यार्थ्यावर ३० लाख रुपये खर्च झाला, हे लक्षात घेता भविष्यात रोजगारक्षम अभ्यासक्रमांनाच प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.Maharashtra Assembly Monsoon Session 2025:
नविन धोरणासाठी समिती नेमली
या चारही संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या, शिष्यवृत्ती संख्यात्मक मर्यादा आणि प्रवेश धोरण गुणवत्तेच्या निकषावर आधारित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती देत लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही अजित पवार यांनी सांगितले.
या संस्था म्हणजे काय? उद्देश व कार्य
1. बार्टी (BARTI – Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute):
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत संस्था. दलित, भटके-विमुक्त, मागासवर्गीय समाजासाठी संशोधन, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देणे.Maharashtra Assembly Monsoon Session 2025:
2. सारथी (SARTHI – Chhatrapati Shahu Maharaj Research Training and Human Development Institute):मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण, संशोधनासाठी आर्थिक मदत व मार्गदर्शन.Maharashtra Assembly Monsoon Session 2025:
3. महाज्योती (MahaJyoti – Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute):
विदर्भातील OBC, SEBC विद्यार्थ्यांना शिक्षण व प्रशिक्षणासाठी आवश्यक त्या योजना आणि संधी उपलब्ध करून देणे.
4. आर्टी (ARTI – Anusuchit Jamati Va Navboudh Samaj Kalyan Shikshan Sanstha):
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजाच्या विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण सुविधा, आर्थिक सहाय्य व शिष्यवृत्ती देणारी संस्था.
या संस्थांच्या माध्यमातून शासनाने लाखो विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक पाठबळ दिले आहे. मात्र, भविष्यात हे पाठबळ अधिक परिणामकारक आणि रोजगारक्षम होण्यासाठी धोरणात्मक बदल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.Maharashtra Assembly Monsoon Session 2025
महाराष्ट्रात OBC समाजासाठी संघर्ष करणारे नेते लक्ष्मण हाके यांनी ३ जुलै २०२५ रोजी गिरगाव चौपाटीवर जलसमाधी आंदोलन केल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत निधीवाटपात अन्याय झाल्याचा ठपका ठेवला.
हाके यांचा आरोप: निधी फक्त काही संस्थांसाठीच!
हाके यांच्या मते, शासनाने बार्टी, सारथी, आर्टी यांसारख्या संस्थांना कोट्यवधींचा निधी दिला असताना, महाज्योती आणि इतर OBC संस्थांसाठी निधीच दिला नाही. त्यांनी सांगितले की, “सरकार OBC विद्यार्थ्यांबाबत दुजाभाव करत आहे. निधी समान न देता, फक्त विशिष्ट गटांना प्राधान्य दिलं जातं.”
आंदोलनाचं दृश्य: समुद्रात उतरत घोषणाबाजी
हाके यांनी समुद्रात उतरून जलसमाधी घेण्याचा इशारा दिला. त्यावेळी त्यांनी “अजित पवार हाय हाय” आणि “OBC समाजाला न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणा दिल्या. हा प्रकार पाहण्यासाठी शेकडो कार्यकर्ते व सामान्य नागरिक उपस्थित होते. सोशल मिडियावर या आंदोलनाचे व्हिडिओ आणि प्रतिमा प्रचंड व्हायरल झाले आहेत.
अजित पवार यांचा पलटवार – अधिवेशनात स्पष्टीकरण
आज, ४ जुलै रोजी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात, अजित पवारांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देत सांगितले की, “सारथी, बार्टी, महाज्योती, आर्टी या सर्व संस्थांसाठी समान धोरण तयार करण्यात येत आहे. गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती व प्रवेश देण्यात येतील.”
एनसीपी युवा नेत्यांचा संताप – हाके यांना इशारा
हाके यांच्या आंदोलनानंतर एनसीपी युवक नेते सूरज चव्हाण यांनी त्यांच्यावर टीका केली. “हाके हे स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी स्टंट करत आहेत. लवकरच त्यांना कायद्याने उत्तर दिलं जाईल,” असे चव्हाण म्हणाले. काही ठिकाणी हाके यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याची मागणीही करण्यात आली.
राजकीय वातावरण तापलं – समाजात नाराजी
हाके यांच्या आंदोलनामुळे OBC समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सोशल मिडियावर अनेकांनी त्यांच्या आंदोलनाचे समर्थन केले आहे, तर काहींनी याला राजकीय स्टंट म्हटलं आहे. विरोधकांनीही या मुद्द्यावरून शासनाला धारेवर धरले आहे.