Lumpy Skin Disease Alert in Jalgaon| जळगाव जिल्ह्यात लंपी आजाराचा धोका वाढत असून प्रशासनाने लसीकरण व स्वच्छतेवर भर देण्याचे आवाहन केले आहे. पशुपालकांनी त्वरीत लक्षणे ओळखून खबरदारी घ्यावी.
जिल्ह्यात पुन्हा लंपी रोगाचा प्रादुर्भाव
जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा लंपी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे पशुवैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. पारोळा, एरंडोल, चोपडा, रावेर, यावल येथे गाय-वासरांमध्ये लंपीची लक्षणं आढळून येत असून मृत्यूची नोंदही झाली आहे.

Lumpy Skin Disease Alert in Jalgaon आहेत काय आहे लक्षणं:
त्वचेवर गाठोसा, फोड, सूज
ताप, खोकला, दूध कमी होणे, भूक मंदावणे
डोळे-नाकातून स्त्राव
लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार आवश्यक
Lumpy Skin Disease Alert in Jalgaon उपाययोजना जाणून घ्या…
लसीकरणावर भर देण्याचे आवाहन
स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक
रोग प्रतिबंधासाठी योग्य ती खबरदारी घ्या
जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवणे
माशा-मुंग्यांपासून संरक्षण
त्वचा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. पारोळा, धरणगाव आणि एरंडोल तालुक्यांमध्ये काही प्रमाणात लम्पीचा प्रभाव दिसून येत असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

दोन वर्षापूर्वी जळगाव जिल्ह्यात लम्पीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात गुरांचा मृत्यू देखील झाला होता. त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर देखील झाला होता. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये लम्पीचा प्रसार होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळेच आता जिल्हा प्रशासनाकडून शेतकरी व दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आटे
लम्पी हा आजार कॅप्रीपॉक्स विषाणूमुळे होतो आणि विषाणू वाहक डास, माश्या, गोचिड, चिलटे तसेच बाधित जनावरांच्या संपर्कातील वस्तूंद्वारे पसरतो. जनावरांना १०४-१०५ अंश ताप येणे, पायांवर सूज येणे, अंगभर गाठी दिसणे, भूक मंदावणे, दुध उत्पादन घटणे आणि डोळे नाकातून स्राव होणे ही प्रमुख लक्षणे आहेत. लम्पी आजार झाल्यास गुरांना तात्काळ विलगीकरण करावे आणि पशुवैद्यकांच्या सल्ल्याने उपचार करावेत. जनावरांचे आहार आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हिरवी वैरण, खनिज मिश्रण यांसारख्या पौष्टिक गोष्टींवर भर द्यावा. जखमांवर ड्रेसिंग करणे आणि सुजलेल्या पायांना गरम पाण्याचा शेक देणे फायदेशीर ठरतो.
लसीकरण आणि स्वच्छतेवर भर द्या, ग्रामपंचायतींना पत्र..
या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींन पत्र पाठविण्यात येणार असून, हा आजार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत आवाहन केले जाणार आहे. यामध्ये गोवर्गीय जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. गोठ्याची दररोज स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायतींनी आपल्या गावातील जनावरांच्या गोठ्यांमध्ये फवारणी मोहीम राबवण्याच्याही सूचना दिल्या जाणार आहेत.
सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या येथे वाचा एका क्लिकवर👇🏻
Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?
आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही १५०० रुपये
आजचे राशीभविष्य – 19 जुलै 2025 | Daily Horoscope Today in Marathi
‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड
Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया