मोयगाव/पिंपळगावता.,जामनेर (दि.२७ ऑगस्ट): महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या अवतरण दिनाचे औचित्य साधून आई भवानी देवराईमध्ये वसुंधरा फाउंडेशन व ग्रामस्थ मित्रपरिवाराच्या वतीने १०१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. महाराजांचा अवतरण दिन दि. २८ ऑगस्ट रोजी असून, त्याच्या एक दिवस आधीच या वृक्षारोपण उपक्रमाला सुरुवात झाली.

आई भवानी देवराई या नावाने विकसित होत असलेल्या क्षेत्रात आजवर तब्बल तीन हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये २७ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजल्यापासूनच वृक्षमित्र देवराईत उपस्थित राहून वृक्षारोपण कार्यात सहभागी झाले. वृक्षारोपण ही सेवा त्यांनी आपल्या जीवनाचा नित्यनियम बनवला आहे.
या उपक्रमामध्ये प्रा. महेंद्रसिंह कच्छवाह, डॉ. विश्वजीत भुजंगराव सिसोदिया, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त मनीष पाडळसे, नंदुआप्पा पाटील, दामोदर अण्णा, जीवनसिंग पाटील, गजानन कच्छवाह, एस.आर. पाटील, संजीव पाटील, जितेंद्र महाले, सोपान कवळे, प्रेमजीत सिसोदिया, मनोहर सिसोदिया, अभिषेक पाटील, विकास सिसोदिया, गुरुराज पाटील, विरेंद्र सिसोदिया, पंकज सिसोदिया आदी मान्यवर व वृक्षमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांनी मिळून महाराजांना १०१ वृक्षांच्या माध्यमातून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. यामागचा उद्देश म्हणजे या १०१ वृक्षांच्या रुपाने महाराजांना १०१ वर्षांपेक्षा अधिक दीर्घायुष्य लाभावे हा होता. वृक्षारोपणानंतर उपस्थित सर्वांनी महाराजांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत देवराईतूनच शुभेच्छा दिल्या.
या देवराईत वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमांना स्वतः महाराज उपस्थित राहतात व आपल्या मार्गदर्शनाने व प्रेरणेमुळे या उपक्रमांना नवी उर्जा मिळत असते.
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
बँक ऑफ महाराष्ट्र : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका
नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५
LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी
Latest news 👇🏻
CBSE New Rule :CBSE चा मोठा निर्णय! 8वी ते 12वीसाठी नवीन नियम लागू
केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी 4987 जागांची मोठी संधी!
₹5 लाख ते ₹1 कोटी कव्हरेज – तुमच्यासाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स कोणता?
वेलदोडे खाण्याचे चमत्कारी फायदे
मतदार यादीत तुमचं नाव आहे का? 2025 साठी नाव कसं शोधाल ते येथे वाचा
80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम
Meesho व्यवसाय करून कमवा लाखो रुपये | घरबसल्या कमाईची संधी, कुठलीही गुंतवणूक नाही!